मुंबई विद्यापीठ आयोजित उडान – द फ्लाईट ऑफ एक्सटेन्शन-२०२६
गुहागर, ता. 14 : खरे ढेरे भोसले महाविद्यालयाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागामार्फत (DLLE) सादर करण्यात आलेल्या ‘जागर लोकशाहीचा’ या पथनाट्याने रत्नागिरी जिल्हा पातळीवरील उडान महोत्सवात प्रथम पारितोषिक पटकावले. मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व निरंतर शिक्षण विभागाच्या (DLLE) वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या उडान – द फ्लाईट ऑफ एक्सटेन्शन-२०२६ या महोत्सवाअंतर्गत ही स्पर्धा मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय, चाफे येथे संपन्न झाली. KDB College came first in the Flying Festival

मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या उडान महोत्सव अत्यंत उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व निरंतर शिक्षण विभागाचे माजी संचालक प्रा. डॉ कुणाल जाधव आणि संस्थेचे कार्याध्यक्ष श्री रोहित मयेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी मोहिनी मयेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या स्नेहल पालये मॅडम, मुंबई विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य प्रा. विश्वंभर जाधव, सुरेंद्र माचीवले तसेच इतर मान्यवर आणि स्पर्धेचे परीक्षक उपस्थित होते. KDB College came first in the Flying Festival
या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांच्या आंतरिक कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा असून वक्तृत्व, पोस्टर मेकिंग, पोवाडा, क्रिएटिव्ह रायटिंग आणि पथनाट्य अशा विविध प्रकारांचा समावेश करण्यात आला होता. या महोत्सवात जिल्ह्यातील एकूण १२ महाविद्यालयांनी विविध कला प्रकारात सहभाग घेतला होता. KDB College came first in the Flying Festival

‘जागर लोकशाहीचा’ या पथनाट्यातून सहभागी कलाकारांनी लोकशाहीचे महत्त्व, तिची गरज आणि लोकशाही समृद्ध करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रयत्नशील राहणे किती आवश्यक आहे, हा संदेश अतिशय प्रभावी आणि सुरेख सादरीकरणातून मांडला. या सादरीकरणाने रसिक श्रोत्यांची मने जिंकली.

या पथनाट्याचे लेखन आणि दिग्दर्शन महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी यश साळवी याने केले. महाविद्यालयाच्या DLLE विभागाने सादर केलेल्या या पथनाट्यास महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ महेंद्र गायकवाड तसेच प्रा. विराज महाजन यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर डॉ. प्रमोद आगळे, डॉ रामेश्वर सोळंके यांनी या पथनाट्यासाठी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्या दिल्या. KDB College came first in the Flying Festival
