जिल्हाधिकारी डॉ. पाटील; रत्नागिरीत कातळशिल्प पर्यटन महोत्सव
गुहागर, ता. 29 : कोकणातील अश्मयुगीन कातळशिल्पे, खाद्यसंस्कृती आणि कोकणची खेळे नमन यांचे एकत्रित बिझनेस मॉडेल बनवावे. धाडसी पर्यटनासाठी प्रत्येक तालुक्यात पर्यटनस्थळे भरपूर आहेत. तसेच ज्या गावात कातळशिल्प आहेत, त्या गावांनी पुढाकार घेतल्यास कोकण समृद्ध होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले. थिबा राजवाड्याच्या कातळशिल्प पर्यटन महोत्सवात ते बोलत होते. Katalshilpa Tourism Festival in Ratnagiri


रत्नीगिरी येथे कोकण विभाग, पुरातत्व व वस्तूसंग्रहालय संचालनालय आणि निसर्गयात्री संस्था आयोजित पहिल्या कातळशिल्प पर्यटन महोत्सव पार पडला. या महोत्सवाला जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, इन्फिगो आय केअरचे संचालक डॉ. श्रीधर ठाकूर, नालंदा विद्यापीठाचे प्रा. डॉ. तोसाबंता पधान, माजी माहिती व जनसंपर्क अधिकारी सतीश लळित, रत्नागिरी हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर, उपाध्यक्ष उदय लोध, शोधकर्ते सुधीर रिसबुड, डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई, धनंजय मराठे आदी प्रमुख उपस्थित होते.


जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील म्हणाले की, कातळशिल्प या रत्नाचे महत्व ओळखून त्याचे पर्यटनदृष्ट्या विकास झाल्यास त्याचे अर्थाजनामध्ये रूपांतर होईल. यातून कातळशिल्प असलेल्या भागांचा विकास होऊन तेथील गावांचा कायापालट होईल. जिल्ह्यात १७०० पेक्षा जास्त कातळशिल्पांचा योग्य अभ्यास करून त्याचे महत्व लोकांपर्यंत पोहचविले तर येथील पर्यटनाला अधिक चालना मिळेल. Katalshilpa Tourism Festival in Ratnagiri


२०१२ पासून कातळशिल्प अभियान सुरू केले. आज दहा वर्षांनी महोत्सव होतोय, आज आनंदाचा दिवस आहे. युनेस्कोच्या वारसायादीत समाविष्ट होण्यासाठी ९ प्रस्ताव आहेत. पुढील महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे. Katalshilpa Tourism Festival in Ratnagiri
सुधीर रिसबुड, कातळशिल्प शोधकर्ते
सहकार्य करणाऱ्यांचा सत्कार
कातळशिल्प मोहिम व संवर्धनासाठी मदत करणारे उक्षीचे माजी सरपंच मिलिंद खानविलकर, रितू छाब्रिया (फिनोलेक्स इंडस्ट्रीज) यांच्या वतीने जनरल मॅनेजर तानाजी काकडे, तहसीलदार शशिकांत जाधव (Tehsildar Shashikant Jadhav), गुहागर तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे, चवे सरपंच दीपक गवाणकर, देऊड जागा मालक प्रसाद आपटे, देवाचे गोठणे जागा मालक नीलेश आपटे, वास्तुविशारद मकरंद केसरकर, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर, कोटचे संजय पाष्टे, लांज्यातील प्रा. विजय हटकर, रुण, ता. लांजा, यूट्यूबर मुक्ता नार्वेकर, डॉ. श्रीधर आचार्य, सुहास ठाकूरदेसाई, चित्रकार आशुतोष कोतवडेकर, सुशांत पेटकर यांचा सन्मान करण्यात आला. Katalshilpa Tourism Festival in Ratnagiri
महसूली नोंद अत्यंत महत्त्वाची
आधी राजापूरला व सध्या गुहागरमध्ये तहसीलदार असलेल्या सौ. प्रतिभा वराळे (Tehsildar Pratibha Varale) म्हणाल्या की, राजापूरमधील सर्व कातळशिल्पांची महसुली नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जो कोणी जागामालक आहे त्याला या कातळशिल्पांचे संवर्धन करावे लागेल. ही जबाबदारी निश्चित होणे महत्त्वाचे होते. संवर्धनामुळे प्रत्येक गाव सक्षम होणार आहे. Katalshilpa Tourism Festival in Ratnagiri
आपण हे देखील वाचावे
रत्नागिरी जिल्हातील कातळशिल्पांची परिपूर्ण माहिती

