संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 11 : तालुक्यातील आबलोली येथील श्री.विठ्ठल रुखुमाई प्रासादिक भजन मंडळ आबलोली कोष्टेवाडी या मंडळाचे संयुक्त विद्यमाने या वर्षीही कार्तिकी एकादशी महोत्सव तीन दिवस विविध कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाला. Kartiki Festival at Aabloli Vitthal Rakhumai Temple
यावेळी रविवारी श्री. विठ्ठल रखुमाई मूर्तींना अभ्यंग स्नान, सहस्त्रनाम व काकड आरती घेण्यात आली. देवाची पूजा शरद उकार्डे आणि कुटूंब यांनी केली. ह. भ. प. रमेश बुवा नेटके (माऊली)यांनी सुस्वर काकड आरती सादर केली. त्यानंतर दुपारी 03 :00 वाजता महिला मंडळ यांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर सायंकाळी 06:00 वाजता हरिपाठ घेण्यात आला. रात्री 09:00 ते 11:30 या वेळेत रायगड भूषण ह.भ. प. चितळे महाराजांचे नारदीय कीर्तन उत्साहात संपन्न झाले. या कीर्तनाला तबला साथ आबलोलीचे सुपुत्र गुरुप्रसाद आचार्य व हार्मोनियम साथ लेले यांनी दिली. रात्र 12 :00 वाजता विठ्ठल नामाच्या जयघोषात देवाचा मिरवणूक पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला. Kartiki Festival at Aabloli Vitthal Rakhumai Temple

सोमवारी सकाळच्या सत्रात मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. या सभेमध्ये समाजाच्या हिताचे महत्त्वकांशी निर्णय घेण्यात आले. त्यानंतर दुपारी 01:00 वाजता ते 03:00 वाजता या वेळेत आबलोली पंचक्रोशीतील भाविकांनी व नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. त्यानंतर सायंकाळी 04:00 वाजता वाघ बारस निमित्ताने कोकणातील पारंपारिक खेळ ” वाघ बारस ” हा खेळ आबलोली गावातील खालील पागडेवाडी येथील मंडळाच्या वतीने श्री. विठ्ठल रखुमाई मंदिर परिसरात खेळण्यात आला. त्यानंतर सायंकाळी 06:00 ते 09:00 ह्या वेळेत मंदिराच्या आवारातील तुळशीचा विवाह पूर्ण झाला. त्यानंतर कोष्टेवाडीतील प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन तुळशी विवाह साजरा करण्यात आला. Kartiki Festival at Aabloli Vitthal Rakhumai Temple

मंगळवारी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती. तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर मंडळाच्या वतीने भव्यदिव्य असा लकी ड्रॉ सोडत, आकर्षक बक्षीसे देऊन हा कार्यक्रमही उत्साहात संपन्न झाला. त्यानंतर रात्रौ 10:00 वाजता चिपळूण तालुक्यातील दहिवली खुर्द येथील जय हनुमान मंच चिपळूण (बंडू पिरदनकर निर्मित ) यांचा बहुरंगी स्त्रीपात्रानी रत्नागिरी जिल्ह्यात गाजलेली ” महाराष्ट्राची लोककला भारूड ” हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. Kartiki Festival at Aabloli Vitthal Rakhumai Temple
या तीन दिवशी कार्यक्रमाचे नियोजन श्री. विठ्ठल रखुमाई प्रसादिक भजन मंडळ या मंडळाचे अध्यक्ष महेंद्र रेडेकर, उपाध्यक्ष अजित रेपाळ, सचिव सुधाकर ऊकार्डे, खजिनदार दिनेश नेटके, सह. सचिव नरेश निमुणकर, कार्यकारणी सदस्य व महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. अस्मिता रेपाळ, उपा अध्यक्षा सौ.श्वेता ऊकार्डे, सचिव सौ. सुप्रिया ऊकार्डे, खजिनदार सौ. श्रेया गुरसळे आमचे सह. महिला मंडळच्या सर्व सदस्या तसेच नवतरुण मित्र मंडळाचे सर्व सदस्य यांनी विशेष मेहनत घेतली. Kartiki Festival at Aabloli Vitthal Rakhumai Temple
