वेळणेश्वर विद्यालयात माजी सैनिकांचा सत्कार
गुहागर, ता. 31 : सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज वेळणेश्वर विद्यालयामध्ये मेरा युवा भारत रत्नागिरी यांच्या पुढाकाराने कारगिल विजय दिवस निमित्त भव्य वक्तृत्व स्पर्धा व परिसरातील माजी सैनिकांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. Kargil Victory Day Oratorical Competition
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक श्री.मोरे सर यांनी मेरा युवा भारत रत्नागिरीचे कार्यकर्ते श्री.सुनील जाधव व श्री.अनिकेत जाधव यांचा तसेच माजी सैनिक श्री. बाळकृष्ण शिंदे, शालेय समिती सदस्य श्री.चैतन्य धोपावकर व पालक गुश्री.दत्तात्रय वावरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. Kargil Victory Day Oratorical Competition

कारगिल विजय दिवस निमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेमध्ये विद्यालयातील जवळपास 31 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये साध्वी नाटेकर इ.10 वी प्रथम क्रमांक, सांची धोपावकर इ.10 वी द्वितीय क्रमांक, तर शामिली पावरी इ.8 वी तृतीय क्रमांक पटकावला. तसेच सुरज वावरे, दिया देवळे व प्रियल कांबळे या इ.10 वी मधील विद्यार्थ्यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला. या वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण मेरा युवा भारत चे कार्यकर्ते श्री.अनिकेत जाधव यांनी पाहिले. या स्पर्धेसाठी बक्षीस म्हणून सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक व पुष्पगुच्छ असे स्वरूप ठेवण्यात आले होते. Kargil Victory Day Oratorical Competition

विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्वा मधून भारतीय वीरांच्या शौर्यगाथा, कारगिल विजय दिवस व त्या वेळचे युद्ध यामधील प्रसंग आपल्या मनोगतातून व्यक्त केले. या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना मान्यवर विद्यालयातील इयत्ता दहावीचे पालक श्री.वावरे यांनी कारगिल युद्ध का झाले याविषयीची पार्श्वभूमी व भारत पाकिस्तान यांच्यामधील संबंध याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. श्री.अनिकेत जाधव यांनी विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेचे महत्त्व सांगत असताना भारतीय वीरांचे आपण स्मरण करणे गरजेचे असल्याचे व्यक्त केले. या वक्तृत्व स्पर्धेबरोबरच परिसरातील सैनिकांचा सत्कार देखील या मेरा युवा भारत रत्नागिरी यांचे मार्फत करण्यात आला. Kargil Victory Day Oratorical Competition

यावेळी गावातील माजी सैनिक श्री.बाळकृष्ण शिंदे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन आदर व सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक श्री.मोरे यांनी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कलेचे कौतुक करताना त्यांनी सादर केलेले भाषण तसेच विषय खूपच सुंदर रित्या मांडले, असे व्यक्त करताना पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या. सहाय्यक शिक्षक श्री. मांजरे यांनी माजी सैनिक श्री. बाळकृष्ण शिंदे यांचा परिचय करून दिला. Kargil Victory Day Oratorical Competition
या कार्यक्रमाबरोबरच चालू शैक्षणिक वर्षांमध्ये इ.11 वी कॉमर्स शाखेमध्ये मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना विद्यालयातर्फे मोफत पाठ्यपुस्तक वितरण व पेढा भरून त्यांचे विद्यालयामध्ये स्वागत करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व इ.8 वी ते इ.12 वी चे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.चिले सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री.लादे सर यांनी मानले. Kargil Victory Day Oratorical Competition