संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 11 : दापोली तालुक्यातील कर्दे गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी दिनेश काशिनाथ रुके यांची सर्वानुमते एक मताने निवड करण्यात आली आहे. कर्दे ग्रामपंचायतीची ग्रामसभा मकरंद तोडणकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच उत्साहात संपन्न झाली. यावेळी सुरेंद्र माने यांनी दिनेश रुके यांची तंटामुक्ती अध्यक्ष पदी नियुक्ती व्हावी. अशी सूचना मांडली या सूचनेला प्रशांत पेवेकर यांनी अनुमोदन दिले. Karde Tantamukti Samiti President Dinesh Ruke

सामाजिक कार्यकर्ते आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले )या पक्षाचे दापोली तालुका सरचिटणीस तसेच जि. प. पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा कर्दे या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सतत 8 वर्ष आणि ब्रह्मा विष्णू महेश क्रीडा मंडळ कर्दे, दापोली तालुका समुद्र किनारपट्टी बैलगाडी शर्यत संघटना यांचे सचिव व कबड्डी राज्य पंच आणि बौद्धवाडीचे विद्यमान अध्यक्ष, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य, ग्राम पाणीपुरवठा समितीचे माजी सचिव अशी उल्लेखनीय कामे करणारे सामाजिक कार्यकर्ते दिनेश काशिनाथ रुके यांची कर्दे गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने संपूर्ण दापोली तालुक्यातून विविध राजकीय, सामाजिक, धार्मिक संघटनांकडून दिनेश रुके यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून कर्दे गावचे सरपंच सचिन तोडणकर, ग्रामपंचायत अधिकारी संदेश घोगरे, मंडळ अधिकारी शरद सानप, महसूल अधिकारी दीपक पवार यांचेसह ग्रामपंचायतच्या सदस्यांनी दिनेश रुके यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. Karde Tantamukti Samiti President Dinesh Ruke