• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार गुहागरला जाहीर

by Ganesh Dhanawade
April 21, 2022
in Bharat
16 0
1
Kane Adarsh Award announced to Guhagar

गुहागर पत्रकार संघ

32
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम देशमुख यांनी केली घोषणा

मुंबई, दि. २1 : मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने देण्यात येणाऱा स्व.वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार गुहागरला जाहीर झाला आहे. मे महिन्यात परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम देशमुख यांनी आज पुरस्कारांची घोषणा केली. Kane Adarsh Award announced to Guhagar

महाराष्ट्रात अनेक तालुका पत्रकार संघ सामाजिक बांधिलकी जपत उत्तम काम करीत आहेत. मात्र त्यांच्या कार्याची राज्य पातळीवरून फारशी कोणी दखल घेत नसल्याने पत्रकारांबद्दल एक नकारात्मक दृष्टीकोन बळावत चालला होता. हे टाळण्यासाठी उत्कृष्ट कार्य करणारया तालुका आणि जिल्हा संघांना राज्य पातळीवर सन्मानित करण्याचा निर्णय परिषदेने घेतला आणि त्यानुसार दरवर्षी तालुका आणि जिल्हा संघांना सन्मानित केले जात आहे. यंदाचे पुरस्काराचे आठवे वर्ष आहे. Kane Adarsh Award announced to Guhagar

पुरस्कारांचे वितरण देखील ग्रामीण भागातच व्हावे असा परिषदेचा अट्टाहास आहे. त्यानुसार २०२१ च्या आदर्श तालुका आणि जिल्हा संघ पुरस्काराचे वितरण शनिवार दिनांक ७ मे २०२२ रोजी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे होत असल्याचे एस.एम देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. Kane Adarsh Award announced to Guhagar
२०२१ च्या पुरस्कारासाठी निवड झालेल्या तालुका पत्रकार संघांची महसूल विभाग निहाय नावे पुढील प्रमाणे आहेत.
1) लातूर विभाग      : नायगाव तालुका पत्रकार संघ जि. नांदेड
2) औरंगाबाद विभाग : सिल्लोड तालुका पत्रकार संघ, जि. औरंगाबाद
3) कोल्हापूर विभाग  : सावंतवाडी तालुका पत्रकार संघ, जि. सिंधुदुर्ग
4) कोकण विभाग    : गुहागर तालुका पत्रकार संघ, जिल्हा रत्नागिरी
5) नाशिक विभाग    : जामखेड तालुका पत्रकार संघ जिल्हा अहमदनगर
6) पुणे विभाग         : फलटण तालुका पत्रकार संघ, जिल्हा सातारा
7) अमरावती विभाग : रिसोड तालुका पत्रकार संघ, जिल्हा वाशिम
8) नागपूर विभाग    : नरखेडा तालुका पत्रकार संघ, जिल्हा नागपूर.
वरील तालुका पत्रकार संघांना स्मृतिचिन्ह, मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गंगाखेड येथे तालुका अध्यक्षांच्या मेळाव्यात ७ मे रोजी सन्मानित करण्यात येत आहे. पुरस्कार प्राप्त सर्व तालुका संघाचे पदाधिकारी, कार्यकारिणीने पुरस्कार घेण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, कोषाध्यक्ष विजय जोशी, राज्य प्रसिध्दीप्रमूख अनिल महाजन, राज्य महिला संघटक जान्हवी पाटील आदिंनी केले असून परिषदेच्या वतीने आठही तालुका संघाचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. Kane Adarsh Award announced to Guhagar

Tags: GuhagarGuhagar NewsKane Adarsh Award announced to GuhagarLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.