गुहागर खालचापाट फ्रेंड सर्कल आयोजन, उपविजेता संघ गुरुकृपा पालशेत
गुहागर, ता.15 : खालचापाट येथील फ्रेंड सर्कल कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळातर्फे स्पर्धा आयोजित केली होती. तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत गुरुकृपा पालशेत संघावर मात करत कालिकामाता धोपावे संघाने विजेतेपद पटकावले. कालिकामाता धोपावे संघाने दत्तसेवा वेळणेश्वर संघावर तर गुरुकृपा पालशेत संघाने मास्टर अविनाश नरवण संघावर मात करत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. अंतिम सामनामध्ये गुरुकृपा पालशेत संघाने प्रथम फलंदाजी करत सहा षटकांमध्ये एकूण 59 धावा केल्या. धोपावे संघाने पाच षटकांमध्येच उद्दिष्ट गाठत अंतिम विजेतेपद पटकाविले. Kalikamata Dhopave team winner


स्पर्धेतील प्रथम विजेत्या कालिकामाता धोपावे संघला 25 हजार व आकर्षक चषक, उपविजेत्या गुरुकृपा पालशेत द्वितीय संघला 15000 रोख रुपये व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून आदेश जाक्कर (धोपावे), गोलंदाज दीपेश ठोंबरे (पालशेत), क्षेत्ररक्षक सौरभ आरेकर (पालशेत) तर अंतिम सामन्यातील सामनावीर मालिकावीर व षटकार किंग सुबोध जाधव (धोपावे) यांची निवड करण्यात आली. Kalikamata Dhopave team winner
स्पर्धेच्या बक्षीस समारंभासाठी जीवनश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष वरंडे (President of Jeevanshree Pratishthan Santosh Varande), राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष (District Vice President of NCP) पद्माकर आरेकर (Padmakar Aarekar), माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे (Former Mayor Jaydev More), श्यामकांत खातू, सुहास सुर्वे, शशिकांत शिंदे, रजनीनाथ वराडकर, वसंत पावसकर, मंडळाचे अध्यक्ष सागर मोरे, सचिव रोहन विखारे, उपाध्यक्ष अनिकेत भोसले आदी उपस्थित होते. Kalikamata Dhopave team winner