रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन च्या मान्यतेने
गुहागर, ता. 04 : दर्यावर्दी प्रतिष्ठान, पालशेत या संस्थेच्या २५ वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचा रौप्य महोत्सवानिमित्त समारोप सोहळा दि. ४, ५ व ६ मार्च रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. समाजहितासाठी समर्पित सेवाभाव, विश्वास आणि एकजुटीच्या बळावर हा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. तरी या आनंदोत्सवात आपली उपस्थिती आम्हाला नवी ऊर्जा व प्रेरणा देणारी ठरेल. असे दर्यावर्दी प्रतिष्ठानमार्फत कळविणेत आले आहे. Kabaddi competition of Daryawardi Pratishthan
या रौप्य महोत्सवानिमित्त आज दि. ४ मार्च रोजी दु. ४.०० वाजता पोमेंडी फाटा ते दर्यावर्दी प्रतिष्ठान क्रीडा नगरी पर्यंत भव्य क्रीडा ज्योत रॅली काढण्यात येणार आहे. सायं. ६.०० वा. कबड्डी स्पर्धांचे उद्घाटन होईल. दि. ४ मार्च ते ५ मार्च या दोन दिवस होणाऱ्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा समारोप व बक्षीस वितरण समारंभ प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत होणार आहे. Kabaddi competition of Daryawardi Pratishthan

या समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी मा. अॅड. अपूर्वा बारगोडे (सदस्य, जिल्हा परिषद, रत्नागिरी) मा. श्री. विकास दाभोळकर (अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र मच्छिमार-कष्टकरी खलाशी महासंघ, महाराष्ट्र राज्य) मा. श्री. प्रणव पोळेकर (सदस्य, पंचायत समिती, गुहागर) मा. श्री. दत्ताराम पाटील (अध्यक्ष, जयभारत मच्छिमार सहकारी सोसायटी लि. पालशेत) हे उपस्थित राहणार आहेत. Kabaddi competition of Daryawardi Pratishthan
दर्यावर्दी प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त स. ९.०० वा. श्री सत्यनारायण महापूजा, स. ११.०० वा. महाआरती, दु. १२.०० वा.महाप्रसाद, दु. ३.३० वा. हळदी कुंकू समारंभ यावेळी प्रमुख वक्त्या : सौ. नमिता प्रसन्ना वैद्य, एम.ए. बीएड. माध्यमिक शिक्षिका, न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या उपस्थित राहणार आहेत. सायं. ७.००वा. दर्यावर्दी प्रतिष्ठान, पालशेत यांचे भजन. रात्री ८.०० वा. महाआरती, रात्री १०.०० वा. फटाक्यांची आतषबाजी, रात्रों १०.१५ वा. आभार संस्था (रजि.) संचलित माऊली महिला रत्नागिरी याचे चौरंगी नमन यामध्ये पौराणिक ब्रह्मासत्य गण आणि भन्नाट गौळण व वगनाट्य -पौराणिक सीता स्वयंवर. Kabaddi competition of Daryawardi Pratishthan
