• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

न्यायाधिशांच्या घरी चोरी

by Guhagar News
May 18, 2022
in Bharat
16 0
0
न्यायाधिशांच्या घरी चोरी
32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp
न्यायधिशांच्या शासकीय निवासस्थानात घुसून, पत्नी आणि मुलीला मारहाण करुन तब्बल 3 लाखाचे किंमतीचे दागिने आणि रोकड चोरण्याचे धाडस तीन चोरांनी केले. निवासस्थानाबाहेरील पोलीस, निवासस्थानातील स्वयंपाकी, अन्य शिपाई या सर्वांचा डोळा चुकवून चोरी केल्याने पोलीसांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. आम्ही त्या चोरांना शोधुन काढूच. पण त्यांचे हे कृत्य धाडसाचे आहे. अशी प्रतिक्रिया पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. 
ही घटना बिहार राज्यातील रोहतास मधील आहे. न्यायाधिशांच्या पत्नी गुंजा कुमारी यांच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी (ता. 17) मा. न्यायाधिश महेंद्रनाथ पांडे हे नेहमीप्रमाणे न्यायालयात निघुन गेले. त्यानंतर सकाळी 10 वाजण्याच्या सुमार तीन इसम न्यायाधिशांना भेटण्याच्या बहाण्याने निवासस्थानी आले. सौ. गुंजा कुमारी यांनी सदर इसमांना पांडेसाहेब न्यायालयात भेटतील. असे सांगितले. त्यावर या तिघांनी पाणी मागितले. पाणी देण्यासाठी सौ. गुंजाकुमारी स्वयंपाकघरात गेल्या. त्याच्यापाठोपाठ तिघांपैकी एका चोराने गुंजाकुमारी यांच्या डोक्याला बंदूक लावली. अंगावरील सर्व दागिने काढून घेतले. गुंजा कुमारी यांच्या शयनकक्षातील कपाट उघडून त्यातील दागिने आणि रोकड हस्तगत केली. यावेळी सौ. गुंजाकुमारी आणि त्यांची मुलगी यांनी प्रतिकार केला. म्हणून चोरांनी दोघींना मारहाण केली. अवघ्या तासाभरात चोरीचा माल घेवून तिघांनी पलयान केले. 
Cataract Screening camp at Guhagar
चोरीचे वृत्त कळताच रोहतासचे पोलिस अधीक्षक कुमार आशिष यांनी न्यायाधिशांच्या निवासस्थानाला भेट दिली. "हे धाडसाचे कृत्य आहे आणि पोलिसांसाठी एक मोठे आव्हान आहे. आम्ही या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावू आणि चोरांना अटक करु. असे त्यांनी सांगितले. 
Tags: GuhagarGuhagar NewsJudge's house burgledLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.