गुहागर तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त वितरीत
गुहागर, ता. 05 : गुहागर तालुका पत्रकार संघातर्फे वितरीत करण्यात येणारा कै. सुभाष शांताराम गोयथळे स्मृती गौरव पुरस्कार पत्रकार दिनानिमित्त अपंग पुर्नरवसन संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग यांना देवून सन्मानित करण्यात येणार आहे. Journalist’s Day
दि. ६ जानेवारी २०२६ रोजी पत्रकार दिनादिवशी गुहागर शहरातील मँगो व्हिलेज येथील बँकेट हॉलमध्ये सकाळी ११ ते २ या वेळेत हा पुरस्कार देण्यात येणार आहे. दि. ६ जानेवारी १८३२ मध्ये आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ सुरू केले. यामुळे हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून गुहागर तालुका पत्रकार संघाच्यावतीने दरवर्षी तालुक्यात समाजाभिमुख कार्य करणाऱ्या व्यक्तींना कै. सुभाष शांताराम गोयथळे स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाते. हा सन्मान अपंग पुर्नरसन संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग यांना प्रदान करण्यात येणार आहे. Journalist’s Day

यादिवशी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवाद करून कार्यक्रमाची सुरूवात केली जाणार आहे. त्यानंतर नुकतेच गुहागर समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबातील तीघेजण बुडत असताना त्यापैकी दोघांचे प्राण वाचवीणारे गुहागर नगरपंचायतीचे जीवरक्षक, समर्थ स्पोर्ट क्लबचे कर्मचारी यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर गटविकास अधिकारी शेखर भिलारे, मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण, तालुका कृषी अधिकारी अमोल क्षिरसागर, नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. निता मालप, सर्व नगरसेवक, नगरसेविका यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन गुहागर तालुका पत्रकार संघाने केले आहे. Journalist’s Day
