माजी आमदार डॉ. विनय नातू यांचे प्रतिपादन
गुहागर, ता. 08 : समाजातील घडणाऱ्या विविध घटनांची नोंद जसे पत्रकार ठेवतात. तसेच समाजामध्ये चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव गुहागर तालुका पत्रकार संघ करत आहे. यामुळे योग्य व्यक्तीचा सन्मान करण्याचे काम गुहागर तालुका पत्रकार संघाने केले आहे. असे प्रतिपादन भाजपाचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी केले. Journalist Day celebrated in Guhagar.

गुहागर तालुका पत्रकार संघाच्यावतीने ६ जानेवारी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी माजी आमदार डॉ. विनय नातू बोलत होते. त्यांनी यापुढे बोलताना येथील पत्रकाराने विविध विषयावर लिखाण करताना जे पुढच्या पीढीसाठी उपयोगी ठरेल असे लिखाण केले पाहीजे. समाजातील बारकावे शोधून केलेले लिखाण व त्यातून या भागाचा होणार विकास यामध्ये गुहागरातील पत्रकार चांगले काम करत आहेत. त्यांच्या या कामकाजाला सर्वांनी सहकार्य केले पाहीजे. व यापुढीही येथील पत्रकार संघ चांगल्या पद्धतीने काम करेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. यावेळी दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची शुरूवात करताना आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार तसेच संविधान पुस्तीकेचे पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले. Journalist Day celebrated in Guhagar.

यावेळी तहसिलदार परिक्षीत पाटील यांनी बोलताना पुर्वीच्या पत्रकारीतेपेक्षा यावेळची पत्रकारीता सोपी आहे. तसे असले तरी आताच्या सोशल मिडीयाच्या या स्पर्धेमध्ये अचुक व सत्य बातमी देणे हे आवाहन बनले आहे. येथील पत्रकार नेहमीच प्रशासन आणि जनता यामधील विकासात्मक दुवा साधण्याचे काम करत आहे. येथील पर्यटन वाढीसाठी ब्ल्यू फ्लॅगच्या अंतिम मानांकनासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षीत आहे. ही संधी पुन्हा येणार नाही असे मत व्यक्त केले. Journalist Day celebrated in Guhagar.

गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी बोलताना प्रशासनाला पत्रकारांचे चांगले सहकार्य लाभत आहे. आपण संविधान चळवळ सुरू करताना वाचन संस्कृती टीकावी यासाठी हा उपक्रम राबवीला असल्याचे स्पष्ट केले. तर मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांनी बोलताना शहराच्या विकासासाठी आपले प्रयत्न आहेत. त्याचबरोबर जनतेचेही सहकार्य अपेक्षीत आहे. ब्ल्यु फ्लॅग प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जनतेबरोबर पत्रकारही चांगले सहकार्य करत असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. Journalist Day celebrated in Guhagar.

यावेळी अपंग पुर्नरवसन संस्थेचे अध्यक्ष उदय वसंत रावणंग यांना कै. सुभाष शांताराम गोयथळे स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मानचीन्ह तसेच श्री दुर्गादेवी देवस्थानच्यावतीने रूपये ५ हजाराचा धनादेश देऊन सन्मानीत करण्यात आले. तसेच गटविकास अधिकारी शेखर भिलारे, मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण व कृषी अधिकारी अमोल क्षिरसागर यांचा सन्मान करण्यात आला. तर डिसेंबरमध्ये समुद्रामध्ये बुडणाऱ्या तीन पर्यटकांना वाचवीण्याचे काम करणारे गुहागर नगरपंचायतीचे जीव रक्षक प्रदेश तांडेल, आशिष सांगळे तसेच श्री समर्थ वॉटरस्पोर्टचे कर्मचारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. निता मालप व १७ नगरसेवक, नगरसेविका यांचा सन्मान करण्यात आला. Journalist Day celebrated in Guhagar.

या कार्यक्रमाला माजी आमदार डॉ. विनय नातू, तहसिलदार परिक्षित पाटील, गटविकास अधिकारी शेखर भिलारे, मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण, तालुका कृषी अधिकारी अमोल क्षिरसागर, नगराध्यक्ष सौ. निता मालप, पोलिस निरिक्षक सचिन सावंत, माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, दुर्गादेवी देवस्थानचे सचिव संतोष मावळणकर, मॅगो व्हिलेजचे श्रीहरी पानवलकर, गुहागर पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज बावधनकर, सत्यवान घाडे, निलेश गोयथळे, संकेत गोयथळे, गणेश धनावडे, मंदार गोयथळे, संतोष घुमे, राजन दळी, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष साहील आरेकर, शिवसेनेचे शहराध्यक्ष निलेश मोरे, अमरदिप परचुरे, भाजप जिल्हा सचिव निलेश सुर्वे, सचिन ओक, व्याडेश्वर देवस्थान अध्यक्ष शार्दुल भावे, मनसे तालुका प्रमुख सुनिल हळदणकर, सर्व नगरसेवक, नगरसेविका, प्रभुनाथ देवळेकर व ग्रामस्थ उपस्थित होते. Journalist Day celebrated in Guhagar.

