गुहागर, ता. 19 : रविवारी दि. २४ एप्रिल 22 रोजी सकाळी १०.३० ते १ वाजेपर्यंत रत्नागिरी झाडगाव येथील माधवराव मुळ्ये भवन सभागृहामध्ये कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा विश्व संवाद केंद्राच्या वतीने महाविद्यालयीन व व्यावसायिक तरूण-तरुणी यांच्याकरिता नागरी पत्रकारिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा मोफत आहे. Journalism workshop in Ratnagiri


या कार्यशाळेत ज्येष्ठ पत्रकार आणि सोशल मीडियासंबंधी अनुभवी पत्रकार तीन सत्रांमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. पहिल्या सत्रात प्रसार माध्यमे (मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल) व्याप्ती, मर्यादा, समाज आणि प्रशासनावर होणारा माध्यमांचा प्रभाव, पत्रकारितेसंबंधीचे मूलभूत कायदे यावर मार्गदर्शन केले जाईल. Journalism workshop in Ratnagiri


त्यानंतर बातमी म्हणजे काय, बातमी कशी शोधावी, बातमी कशी लिहावी, मजकुराचे सादरीकरण यासंबंधी मार्गदर्शन करण्यात येईल. मोबाईलच्या माध्यमातून बातमी चित्रीत कशी करावी, चित्रीकरणाचे मुलभूत तंत्र व अपलोडिंगचे ज्ञान, सोशल मीडियाचा प्रभावी वापर यासंबंधी योग्य माहिती देण्यात येईल. Journalism workshop in Ratnagiri
या कार्यशाळेसाठी पत्रकार नसलेल्या पण पत्रकारितेविषयी उत्सुकता असलेल्या महाविद्यालयीन व व्यावसायिक युवा वर्गाला या कार्यशाळेत सहभाग घेता येईल.तसेच तरुण- तरुणींनी मोठया संख्येने सहभागी व्हावे.
अधिक माहितीसाठी प्रमोद कोनकर (9422382621), रवींद्र भोवड (7820912977), अमेय रायकर (8830548713) यांच्याशी संपर्क साधावा. Journalism workshop in Ratnagiri