भाजपा प्रदेशाध्यक्ष मान.रविंद्रजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
गुहागर, ता. 12 : भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष गुहागर तालुक्याच्यावतीने शनिवार दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी शृंगारतळी नजीक जानवळे येथील भवानी सभागृहात सायंकाळी 5 पासून पारंपारिक जाखडी नाच महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणची लोककला, जुन्या धार्मिक, सांस्कृतिक रुढी परंपरा टिकण्यासाठी विविध माध्यमांतून प्रयत्न केले जात आहेत. Jakhadi Festival in Guhagar
जुनी लोककला परंपरा असलेल्या आगळ्यावेगळ्या जाखडी महोत्सवाचे आयोजन प्रथमच गुहागर तालुक्यात होत आहे. या पारंपारिक जाखडी महोत्सवात गुहागर तालुक्यातील 10 नाच मंडळांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून प्रत्येक मंडळाने 20 मिनिटांमध्ये आपली लोककला सादरीकरण करायची आहे. Jakhadi Festival in Guhagar

भजन, शक्ती तुरा नाच, नमन स्पर्धा, महोत्सव अनेक ठिकाणी होतात. मात्र जुनी परंपरा असलेली पारंपारिक जाखडी नाच स्पर्धा किंवा महोत्सव गुहागर तालुक्यात झाला नव्हता जुनी पारंपारिक लोककला असलेली जाखडी ही विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने कोकणातील प्रत्येक गावात, वाडीमध्ये गणपती सणामध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसून येते. जुनी लोककला परंपरा ही टिकली पाहिजे या उद्देशाने पारंपारिक जाखडीला व्यासपीठ मिळावे, वेगवेगळ्या पद्धतीने नाचाचे प्रकार, जुनी महाभारत, रामायण कथेवरील गाणे आधुनिक तंत्रज्ञान युगात नवीन पिढीला समजली पाहिजे यासाठी या पारंपारिक जाखडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. Jakhadi Festival in Guhagar
तरी या पारंपारिक जाखडी महोत्सवात गुहागर तालुक्यातील जास्तीत जास्त मंडळांनी सहभागी व्हावे, तसेच तालुकावासियांनी या महोत्सवात उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन गुहागर तालुका भाजपा तालुकाध्यक्ष अभय भाटकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सचिन मुकुंद ओक मो. 9421187497, संतोष सांगळे मो. 9405056079, प्रथमेश पाडेकर मो. 8888130251 यांच्याजवळ संपर्क साधण्याचे आवाहन भाजपा गुहागर तालुका वतीने करण्यात आले आहे. Jakhadi Festival in Guhagar