गुहागर, ता. 28 : असगोली जि प.गटामधे महायुतीकडून संतोष जैतापकर हे निवडणूक रिंगणात उतरले असून, त्यांनी नुकताच भारतीय जनता पार्टीतून शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशानंतरची ही त्यांची पहिलीच जिल्हा परिषद निवडणूक असल्याने, या लढतीकडे विशेष लक्ष दिले जात आहे. नव्या राजकीय वाटचालीत संतोष जैतापकर गावोगावी फिरून मतदारांशी संवाद साधताना दिसत आहेत. संघटन मजबूत करणे, विकासाच्या मुद्द्यांवर भूमिका मांडणे आणि मतदारांशी थेट संपर्क साधणे यावर ते भर देत असून, त्यामुळे असगोली गटात प्रचार अधिक गतिमान झाला असुन संतोष जैतापकर यांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. Jaitapkar gets increasing support from voters

संतोष जैतापकर यांनी प्रचारात आघाडी घेतली असुन त्यांचा प्रचारही नियोजनबद्ध सुरू आहे. प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीघाटीवर त्यांनी जास्त भर दिला आहे. शेवटच्या घटकाच्या मतदारांनजवळ पोहचण्याचा ते प्रयत्न करत आहेत. एकूणच पाहता, दोन्ही उमेदवारांचा शिवसेनेशी संबंधित राजकीय प्रवास लक्षात घेता असगोली जिल्हा परिषद गटातील ही निवडणूक “शिवसेना विरुद्ध शिवसेना” अशीच ओळखली जात आहे. Jaitapkar gets increasing support from voters
