मासू पूर्व मास्करवाडीतील श्री नवतरुण मित्र मंडळाने घेतली भेट
गुहागर, ता. 07 : तालुक्यातील मासू बुद्रुक गावातील पूर्व मास्करवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते विजय मसुरकर यांच्या माध्यमातून श्री नवतरुण मित्र मंडळाने जैतापकर यांची मुंबईत भेट घेतली. त्यांना उन्हात तापत असलेल्या पाण्याच्या टाक्या संदर्भात माहिती दिली. सदर कामासाठी मदत करायचे आश्वासन त्यांनी दिले. व सुमारे ६०००० (साठ हजार ) रुपये किमतीचे टाकीवर लोखंडी छप्पर टाकून टाकीवर सावली करून दिली. याबाबत नवतरुण मित्र मंडळ मासू यांच्या वतीने भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांचा सन्मानचिन्ह भेट देऊन विशेष सत्कार करण्यात आला. Jaitapkar felicitated by Maskarwadi

गुहागर तालुक्यातील मासू बुद्रुक गावातील पूर्व मास्करवाडी ही लोक वस्तीने मोठी असल्याने त्यांना पिण्याच्या पाण्याची खूपच अडचण जाणवत होती. त्यासाठी मुंबईतील दानशूर व्यक्तींनी बोअरवेल पाडून पाण्याच्या मोठया दोन टाक्या बसवून पाणी घरपोच केले होते. परंतु पाण्याच्या टाक्या ह्या उघड्यावर असल्याने त्या उन्हात तापत होत्या. त्यामुळे त्या टाक्यांवर छप्पर करून सावली करणे गरजेचे होते. त्यासाठी मासू गावचे सामाजिक कार्यकर्ते विजय मसुरकर यांच्या माध्यमातून श्री नवतरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष मंगेश मास्कर, दत्ताराम मास्कर, देवजी डिंगणकर, मनोज मास्कर आदी कार्यकर्त्यांनी भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांची सदर कामा संदर्भात मुंबईत भेट घेतली. त्या कामासाठी मदत करायचे आश्वासन त्यांनी दिले. सुमारे ६०००० (साठ हजार ) रुपये किमतीचे टाकीवर लोखंडी छप्पर टाकून टाकीवर सावली करून दिली. त्या निमित्ताने मुंबई येथील नवतरुण मित्र मंडळ पूर्व मास्कर वाडी मासू यांच्या वतीने संतोष जैतापकर यांचा सन्मानचिन्ह भेट देऊन विशेष सत्कार करण्यात आला. Jaitapkar felicitated by Maskarwadi
त्यावेळी मंडळाचे अध्यक्ष मंगेश मास्कर, उपाध्यक्ष प्रदीप मास्कर, सरचिटणीस नितेश मास्कर, सचिन मास्कर, खजिनदार महेश मास्कर, शैलेश मास्कर, प्रसाद डिंगणकर, अविनाश मास्कर, दत्ताराम मास्कर, तेजस मास्कर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. Jaitapkar felicitated by Maskarwadi
