गुहागर, ता. 07 : गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था आबलोली या पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयात संचालक मंडळाच्या मासिक सभेत पतसंस्थेचे अध्यक्ष रामचंद्र हुमणे, उपाध्यक्ष तुकाराम निवाते, संचालक प्रदिप बेंडल, संदेश कदम यांचे हस्ते इंटरनेट बँकींग UPI सुविधेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. Internet facility at Kunbi Patsanstha

या शुभारंभाला कुणबी नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालीका सौ. श्रावणी पागडे, संचालक अनंत पागडे, वैभव आदवडे, उदय गोरीवले, महादेव वणे, अमोल वाघे, संदिप पाष्टे, कार्यलक्षी संचालक अनिल घाणेकर, कर्मचारी वैभव बागवे, संजय आग्रे, संतोष हुमणे, संजय खापले , सुलक्षणा भूवड आदी उपस्थीत होते. यावेळी कार्यलक्षी संचालक अनिल घाणेकर यांनी इंटरनेट बॕकींग UPI या सुविधेबद्दल मौलिक माहिती दिली. Internet facility at Kunbi Patsanstha
