गुहागर, ता.21 : रिगल कॉलेज शृंगारतळीमधील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी विद्यार्थ्यांना योग दिवस या विषयावर सौ. अनुराधा अनिल दामले यांचे मार्गदर्शन लाभले. त्या पतंजली गुहागर प्रभारी व आयुश मंत्रालया अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, आबलोली व हेदवी येथे योग शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. International Yoga Day


रिगल कॉलेज हॉटेल मॅनेजमेटचे विभागप्रमुख प्रा. शैलेश घाणेकर यांच्या हस्ते सौ. अनुराधा दामले यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सौ. दामले मॅडम यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये हा ८ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येत आहे असे सांगितले. योग परंपरा हि भारताची संस्कुती आहे, योग ॠषीमुनिंनी योगाचे फायदे आपल्या ग्रंथामध्ये लिहून ठेवले आहेत. आपल्या शरीराचे मानसिक संतुलन राखण्यासाठी योगा मह्त्त्वपूर्ण आहे. प्राणायम केल्यामुळे आपल्या शरीराला फायदा होतो. मनाचे शुद्धीकरण होते. ओमकार, भ्रामरी, कपालभाती, नाडीशोधन, केवली, अनुलोम-विलोम इ. प्राणायमाचे प्रकार सांगितले. ओमकार, भ्रामरी केल्यामुळे शरीराची एकाग्रता वाढते. अनुलोम–विलोम केल्यामुळे रक्त शुद्ध होते. कपालभाती केल्यामुळे डायबेटीस, डायलेसिस इ. सारखे आजार बरे होतात. तसेच मुळव्याधी थायराईडसाठी बाह्यप्राणायम उपयुक्त आहे. कोरोना काळात मानसिक आणि शारीरिक क्षमता वाढवली तर कोरोनावर मात करू शकतो. आहार ग्रहण पद्धती योग्य असणे गरजेचे आहे. रात्री दहा वाजता झोपले पाहिजे. आजच्या लाईफ स्टाईल मध्ये वेळ काढून प्राणायम व आसने करणे गरजेचे आहे आणि त्यांनी प्राणायम व आसने यांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. International Yoga Day


या कार्यक्रमासाठी रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या रेश्मा मोरे मॅडम, सर्व विद्यार्थी व शिक्षक वर्ग उपस्थित होते. सौ. दामले मॅडम यांनी मार्गदर्शन केल्याबद्दल प्रा. शैलेश घाणेकर यांनी आभार मानले. तसेच रिगल कॉलेज शृंगारतळी असे विविध उपक्रम राबवत असते. या महाविद्यालयाची शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. विविध व्यावसायिक कोर्सेस आहेत. त्यामध्ये १००% नोकरीची हमी देणारा हॉटेल मॅनेजमेट डिग्री व डिप्लोमा हे कोर्स सुरु आहेत . तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी “रिगल कॉलेज शृंगारतळी” तौहीद मॉल, गुहागर विजापूर रोड, शृंगारतळी ७०६६०३४२०० / ७८७५८४३००६ येथे संपर्क साधावा. असे सांगण्यात आले आहे. International Yoga Day