जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व आयुक्तांचा सहभाग
गुहागर, ता. 17 : रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी रत्नागिरी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि कोकण विभागाचे अपर आयुक्त अमोल यादव यांच्या समवेत आज गुहागर विधानसभा मतदारसंघातील चार मतदान केंद्रांना भेट दिली. मतदान व मतदारांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांची पहाणी व चौकशी केली. तसेच एका स्थीर निगराणी पथकाला भेट देवून तेथील कामकाजाची माहिती घेतली. Inspection tour of M. Devender Singh (Collector of Ratnagiri) along with Dhananjay Kulkarni (Superintendent of Police) and Amol Yadav (Additional Commissioner of Konkan Division) regarding election work
Inspection tour of senior officials to Guhagar
निवडणूक आयोगाने (Election Commission of India) मतदान केंद्रांवर कोणत्या सुविधा आवश्यक आहेत याची यादी प्रत्येक निवडणुक कार्यालयाला पाठवली आहे. यामध्ये मतदान केंद्रात (Polling Booth) वीज जोडणी, इव्हीएम मशीन जोडण्याकरीता पुरेशी यंत्रणा, प्रकाश व्यवस्था, पंखे, महिला व पुरुषांकरीता स्वच्छ शौचालय, दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी रॅम्प, व्हील चेअर आदी सोयी सुविधांचा समावेश आहे. निवडणुक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांनी संबंधित मतदान केंद्रांमध्ये या सोयी सुविधांची पूर्तता केलेली आहे. त्याचा आढावा घेण्याकरीता रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, रत्नागिरी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि कोकण विभागाचे अपर आयुक्त अमोल यादव 17 एप्रिलला गुहागर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी काजुर्ली, काजुर्ली मानवाडी, पालपेणे, कुंभारवाडी तर्फे पालपेणे या चार मतदान केंद्रांची पहाणी केली. निवडणूक आयोगाच्या सूचनांप्रमाणे सोयी सुविधांची उपलब्धता आहे का याचे निरीक्षण केले. आदर्श व्यवस्था उभी रहाण्यासाठी आवश्यकत्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. Inspection tour of senior officials
निवडणूकीच्या (Elections 2024) कार्यकाळात बेकायदेशीर व अवैध गोष्टीची वहातूक होऊ नये यासाठी गुहागर तालुक्यात आबलोली व धोपावे येथे दोन स्थीर निगराणी पथकांची (Check Post) स्थापना करण्यात आली आहे. तसेच एक फिरते पथकही कार्यरत झाले आहे. प्रत्येक निगराणी पथकामध्ये १ पोलीस कर्मचारी, १ निवडणूक यंत्रणेतील कर्मचारी तसेच १ छायाचित्र व चित्रीकरण करणारा अशा तिन जणांचा समावेश आहे. स्थिर निगराणी पथकाने सदरच्या मार्गावरुन जाणाऱ्या वाहनांची नोंद ठेवणे, वाहनांची तपासणी करुन त्याचा अहवाल लिहिणे आदी कामे करायची आहेत. ही कामे निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या पध्दतीने होत आहेत का याची माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, रत्नागिरी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि कोकण विभागाचे अपर आयुक्त अमोल यादव यांनी घेतली. Inspection tour of senior officials
यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुहागरमधील निवडणुक प्रशासनातील (Election) अधिकाऱ्यांची भेट घेवून निवडणुक तयारीचा आढावा घेतला. दिव्यांग मतदार, ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांना विशेष सुविधा उपलब्ध करण्याबाबत सूचना केल्या. तसेच प्रशासनाने मतदानाचा टक्का वाढण्यासाठी प्रयत्न करावा. असे आवाहन यावेळी केले. Inspection tour of senior officials