• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
18 June 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आयएनएस कोलकाता महार रेजिमेंटशी संलग्न

by Manoj Bavdhankar
May 27, 2022
in Bharat
16 0
0
INS Kolkata Affiliated with Mahar Regiment

आयएनएस कोलकाता जहाजावरील समूह छायाचित्र

32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नौदलाच्या अधिकाऱ्यांनी केल्या संलग्नता सनदीवर स्वाक्षऱ्या

मुंबई, ता. 27 ; भारतीय नौदलाची स्वदेशी बनावटीची मार्गदर्शित -क्षेपणास्त्र स्टेल्थ विनाशिका, आयएनएस कोलकाता, बुधवारी 25 मे, 2022 रोजी महार रेजिमेंटशी संलग्न झाली. मुंबईत नेव्हल डॉकयार्ड येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात, भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी संलग्नता सनदीवर स्वाक्षऱ्या केल्या. भारतीय सैन्यदलात  सर्वात मानाचे पायदळ म्हणून महार रेजिमेंटची ओळख आहे. INS Kolkata Affiliated with Mahar Regiment

लेफ्टनंट जनरल सी बन्सी पोनप्पा, एव्हीएसएम, व्हीएसएम, भारतीय लष्कराचे ॲडज्युटंट जनरल आणि महार रेजिमेंटचे कर्नल, रिअर ॲडमिरल समीर सक्सेना, एनएम, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग, वेस्टर्न फ्लीट, कमांडंट, ब्रिगेडियर नवनीत जर्याल  महार रेजिमेंटल सेंटर, आणि कॅप्टन प्रशांत हांडू, एनएम, कमांडिंग ऑफिसर, कोलकाता, यांनी संलग्नता सनदीवर स्वाक्षऱ्या केल्या.  

कॅप्टन प्रशांत हांडू, एनएम, कमांडिंग ऑफिसर, कोलकाता यांनी महार रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर नवनीत जर्याल यांना जहाजाचे मानचिन्ह सुपूर्द केले

आयएनएस कोलकाता जहाजावर हा संलग्नता सोहळा पार पडला. संलग्नता सनदेचे आदानप्रदान करण्यात आले. या सोहळ्यात नौदल आणि महार रेजिमेंटच्या बँड तुकड्यांनी संयुक्त संचलन आणि संयुक्त सादरीकरण केले. INS Kolkata Affiliated with Mahar Regiment

INS Kolkata Affiliated with Mahar Regiment
अधिकाऱ्यानी नौदल डॉकयार्डमधील गौरव स्तंभ येथे शूरवीरांना आदरांजली वाहिली.

योगायोगाने, कोलकात्याचे ब्रीदवाक्य “युद्धाय  सर्वसनध” (युद्धासाठी नेहमी तयार) आणि महार रेजिमेंटचे ब्रीदवाक्य “यश सिद्धी” (यश आणि प्राप्ती) एकमेकांना पूरक आणि साजेशी आहेत. INS Kolkata Affiliated with Mahar Regiment

INS Kolkata Affiliated with Mahar Regiment
अधिकाऱ्यानी संलग्नता सनदेचे आदानप्रदान केले
INS Kolkata Affiliated with Mahar Regiment
आयएनएस कोलकाता जहाजावर नौदल आणि महार रेजिमेंटचे संयुक्त गार्ड ऑफ ऑनर
Tags: GuhagarGuhagar NewsIndian NavyINS KolkataINS Kolkata Affiliated with Mahar RegimentLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.