गुहागरच्या जुनी पेन्शन संघटनेचा पुढाकार
गुहागर, दि. 07 : तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने पुढाकार घेतला आहे. इयत्ता ५वी च्या सराव शिष्यवृत्ती परिक्षेचे नेटके नियोजन करून आदर्श निर्माण केला आहे. पंचायत समितीतीमध्ये सर्व अधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक समन्वय समितीच्या व संघटना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रश्नपत्रिका व अन्य साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. Initiative of Pension Association


पंचायत समिती शिक्षण विभाग आयोजित व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना गुहागर यांच्या सौजन्याने इ. ५ वी शिष्यवृत्ती सराव परीक्षा गुहागर तालुक्यात नुकतीच अत्यंत उत्साहात संपन्न झाली. रत्नागिरी जिल्हाचा पदभार स्विकारणारे नुतन प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. वामन जगदाळे यांच्या प्रेरणेने शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम. लीना भागवत, शिक्षण विस्ताराधिकारी श्री. मुकुंद कासारे, चिंतामणी गायकवाड व सर्व केंद्रप्रमुख यांच्या मार्गदर्शनखाली सदर परीक्षा गुहागर तालुक्यातील विविध केंद्रावर संपन्न झाली. Initiative of Pension Association
शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याबरोबरच या पुढेही गुहागर तालुक्याच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी संघटना अश्याच वैविध्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करत राहील, असे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष अमोल धुमाळ व पदाधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना सांगितले. Initiative of Pension Association


सदर उपक्रमाच्या यशस्वितेसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे गुहागर तालुकाध्यक्ष अमोल धुमाळ, उपाध्यक्ष प्रदीप पडवाळ, सागर भडंगे, सचिव राहुल आमटे, कार्याध्यक्ष महेश आंधळे, कोषाध्यक्ष ईश्वर घनवटे, राज्य प्रतिनिधी दिपक साबळे, जिल्हा प्रतिनिधी शिवराम अंकुलगे, इमाम पाटील, जिल्हा महिला संघटक पल्लवी काळे, सल्लागार बाबासाहेब राशिनकर, डी.के राठोड, साजीद मुकादम, प्रसिद्धी प्रमुख ईश्वर हलगरे, शिवाजी गायकवाड, संपर्क प्रमुख प्रभु हंबर्डे, शारिक अहमद, सहचिटणीस धनंजय डिसले, पांडुरंग फड, गणेश रोडे, जुनैद शेख, महिला प्रतिनिधी निशिगंधा भुते, प्रमुख प्रवक्ते अनिलराजे शिंदे, धनपालसिंग राजपुत, तालुका संघटक अजय खेराडे, भास्कर गावडे, बीट संघटक अवधूत राऊतराव, गणेश डुबे, नितीन खाडिलकर संजय राठोड व सर्व गुहागर तालुका कार्यकारिणी व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. Initiative of Pension Association

