श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिपळूणतर्फे आयोजन
गुहागर, ता. 05 : ज्येष्ठ नागरिक संघ जुईनगर, नवी मुंबई येथे नियमितपणे होणाऱ्या सभेत श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिपळूण या संस्थेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी माहितीपर परिसंवाद करण्यात आला. यावेळी संस्थेचे वतीने एडवोकेट पंकज दहीबावकर, चेतन महाडिक व विवेक सकपाळ यांनी सहभाग घेतला. Informative seminar for senior citizens
यावेळी एडवोकेट पंकज दहिबावकर यांनी संस्थेची कार्यपद्धती, आर्थिक स्थिती, आर्थिक सुरक्षितता, संस्थेचा कार्य विस्तार तसेच संस्थेमध्ये असलेले विविध ठेव योजना व कर्ज योजना त्याचप्रमाणे संस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या बँकिंगच्या सेवा सुविधा यांची सविस्तर माहिती दिली. यावेळी उपस्थित जेष्ठ नागरिक सभासदांनी त्यांना दैनंदिन आर्थिक व्यवहार करीत असताना येत असलेला अडचणी बाबत चर्चा केली. उपस्थित सभासदांनी संस्थेच्या विविध सेवांची तसेच संस्थेच्या कार्यपद्धतीबाबत माहिती घेतली. तसेच संस्थेच्या प्रगती बाबत उपस्थित ज्येष्ठांनी कौतुक केले. Informative seminar for senior citizens

यावेळी जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने एडवोकेट पंकज दहिबा वकर यांचा भारत कवडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमासाठी जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी तसेच ईश्वर सोनावणे व अनेक सभासद उपस्थित होते. Informative seminar for senior citizens
