विराट कोहलीचा क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील ‘विक्रमी’ झेल!
चेन्नई, ता. 09 : भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या सामन्यात ६ गडी राखुन विजय मिळवत विजयी सलामी दिली आहे. भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज शुभमन गिल विश्वचषक २०२३ च्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळला नाही. त्याच्या जागी सलामीला आलेल्या इशान किशन ने आज साफ निराशा केली. किशन बरोबरच रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर शुन्यावर बाद झाले. भारत संकटात असताना पुन्हा एकदा विराट कोहली आणि के एल राहुल यानी सयंमी फलंदाजी करुन भारताला विजय मिळवुन दिला. २०० धावांचे लक्ष भारताने ४ गड्यांच्या मोबदल्यात पुर्ण केले. India’s winning feat

फलंदाजीत अप्रतिम असण्यासोबतच गिल एक उत्कृष्ट स्लिप क्षेत्ररक्षक देखील आहे. टीम इंडियाला फलंदाजीत गिलची उणीव भासलीच पण क्षेत्ररक्षणात विराट त्याच्या वाटणीची कामगिरीही चोख बाजवताना दिसला. तिसऱ्याच षटकात विराट कोहलीने स्लिपमध्ये अप्रतिम झेल घेत ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर मिशेल मार्शला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. या झेल सह विराट कोहली विश्वचषकातील भारताचा सर्वात यशस्वी क्षेत्ररक्षक बनला आहे. चौथा विश्वचषक खेळत असलेल्या विराटचा हा १५ वा झेल होता. सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत त्याने अनिल कुंबळेंना मागे सोडले. India’s winning feat
माजी लेगस्पिनर अनिल कुंबळेंनी वर्ल्ड कपमध्ये भारताकडून १४ झेल घेतले आहेत. कपिल देव आणि सचिन तेंडुलकर यांनी क्षेत्ररक्षक म्हणून प्रत्येकी १२ झेल घेतले आहेत. दरम्यान भारतीय गोलंदाजानीही चोख कामगीरी बजावत कांगारुना १९९ धावात रोखले. India’s winning feat
