देशवासीयांनी अनुभवला थरार
Guhagar News Special : India’s Chandrayaan-3 mission successful शुक्रवारी 23 ऑगस्टला संध्याकाळी 6.04 वाजता चांद्रयानातील विक्रम लँडरने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले आणि इस्रोच्या प्रयोगशाळेत एकच जल्लोष झाला. देशभरातील कोट्यवधी लोकांनी देखील हा क्षण अनुभवला. भारत आज चंद्रावर उतरणारा जगातला चौथा देश आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगातील पहिला देश ठरला आहे.
India’s Chandrayaan mission successful
त्या पाठोपाठ विक्रम लँडरने चंद्रावरील चार फोटोही काढले.
Chandrayaan-3 mission successful
India’s Chandrayaan mission successfulमुळे संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. देशातील सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी देखील या मोहिमेच्या यश प्रत्यक्ष अनुभवले. आज (ता. 23 ऑगस्टला) विक्रम लॅण्डरचे सॉफ्ट लॅण्डींग यशस्वी (Soft Landing of Vikarm Lander) व्हावे म्हणून दिवसभर देशातील अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हिंदु बांधवांनी यज्ञ, पुजापाठ असे सामुहिक कार्यक्रम केले त्याचप्रमाणे मुस्लिम बांधवांनीही चांद्रयानाची मोहिम फत्ते होण्यासाठी नमाज अदा केली. चर्चमध्ये प्रार्थना करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण देश महत्त्वाच्या क्षणांच्या वेळी एकरुप होवून जातो याचे चित्र पहायला मिळाले. Chandrayaan-3 mission successful
जगाने केले अभिनंदन, Chandrayaan-3 mission successful
जागतिक अंतराळ संशोधन संस्था नासाचे (National Aeronautics and Space Administration) प्रशासकीय प्रमुख बिल नेल्सन आणि युरोपीय स्पेस एजन्सीचे (European Space Agency) महासंचालक जोसेफ ॲशबॅकर व चॅम्पियनियग स्पेस डायरेक्टर अनु ओझा ओबेई यांनी भारताच्या या कामगिरीचे अभिनंदन केले आहे. या दोन्ही संस्था चांद्रयान मोहिमेत भारतीय शास्त्रज्ञांना मदतही करत होत्या. त्याचबरोबर नेपाळचे पंतप्रधान पुष्पा कमल दहल, मालदीवचे विदेश मंत्री अब्दुल्लाह शाहिद, पाकिस्तानेच माजी माहिती व प्रसारण मंत्री फवाद चौधरी, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सायरील रॅमाफोसार यांनी देखील भारताचे, इस्रोचे अभिनंदन केले. Chandrayaan-3 mission successful
पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन
सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग येथे ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झाले आहेत. त्यांनी देखील विक्रम लॅण्डर चंद्रावर उतरल्याचे थेट प्रक्षेपण पाहिले. त्यानंतर व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.
पंतप्रधान मोदींचे संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
चांद्रयान मोहिमेतील विक्रम लॅण्डर चंद्रावर कसा उतरला त्याचा व्हिडिओ पहाण्यासाठी इथे क्लिक करा.
चांद्रयान – 3 मोहिमेची माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
चांद्रयान मोहिमेच्या यशातील प्रमुख पाच हिरो कोण आहेत हे वाचण्यासाठी इथे क्लिक करा.