नवी दिल्ली, ता. 16 : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 15 जानेवारी 2026 रोजी भारतीय लष्कर दिनाच्या अभिमानास्पद भारतीय लष्कराच्या शूर सेनानी आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाची एकात्मता व सार्वभौमत्व राखण्यासाठी भारतीय लष्कराचे अतुलनीय शौर्य, अत्युच्च त्याग आणि अढळ निष्ठेबद्दल देश त्यांना अभिवादन करीत आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी एक्स वरील आपल्या संदेशात म्हटले आहे. Indian Army Day

देशाच्या सीमांचे सतर्कतेने रक्षण करणारे आणि कोणत्याही आपत्तीच्या प्रसंगी तत्परतेने मदतीस धावून येणारे भारतीय सैन्यदल आपली कार्यक्षमता, शिस्त आणि मानवतेच्या भावनेतून केलेल्या मदतीमुळे जगभरात आदरास पात्र ठरले आहे. भारतीय लष्कराला आधुनिक, आत्मनिर्भर आणि भविष्यवेधी बनवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. याचा त्यांनी पुनरुच्चार केला. या शूर सेनानीबद्दल संपूर्ण देशाला अभिमान आणि आदर असून देश त्यांच्या प्रति कृतज्ञ आहे, असे त्यांनी पुढे म्हटले. Indian Army Day

