हरित आणि शाश्वत विकास भागीदारीसाठी झाला करार
मुंबई, ता. 03 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चॅन्सलर महामहीम ओलाफ शोल्ट्झ यांनी भारत-जर्मनी आंतर-सरकारी बैठकीच्या (IGC) पूर्ण सत्राचे अध्यक्षपद भूषवले. आपल्या प्रारंभिक भाषणात दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या प्रमुख पैलूंवर तसेच प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर सामायिक दृष्टिकोन अधोरेखित केला. भारत-जर्मनी भागीदारी या गुंतागुतीच्या जगात यशस्वी उदाहरण ठरू शकते यावर पंतप्रधानांनी भर दिला. त्यांनी भारताच्या आत्मनिर्भर भारत मोहिमेत जर्मनीला सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. दोन्ही बाजूंच्या सहभागी मंत्री आणि अधिकार्यांनी आयजीसीच्या विविध विषयांवरील बैठकांचे संक्षिप्त अहवाल सादर केले: India-Germany intergovernmental meeting


परराष्ट्र व्यवहार आणि सुरक्षा.
आर्थिक, वित्तीय धोरण, वैज्ञानिक आणि सामाजिक आदान -प्रदान
हवामान, पर्यावरण, शाश्वत विकास आणि ऊर्जा.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन; परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर; विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (IC) डॉ जितेंद्र सिंह; आणि डीपीआयआयटीचे सचिव अनुराग जैन यांनी भारताच्या वतीने सादरीकरण केले.


हरित आणि शाश्वत विकास भागीदारी स्थापन कारण्याबाबत संयुक्त घोषणापत्रावर पंतप्रधान आणि चॅन्सेलर शोल्ट्झ यांच्या स्वाक्षरीने पूर्ण सत्राचा समारोप झाला. या भागीदारी अंतर्गत शाश्वत विकास उद्दिष्टे आणि हवामान कृतीवरील भारत-जर्मनी सहकार्यासाठी संपूर्ण सरकारी दृष्टिकोनाची कल्पना असून जर्मनीने 2030 पर्यंत नवीन आणि अतिरिक्त विकास सहाय्यासाठी 10 अब्ज युरोची आगाऊ वचनबद्धता करण्यास सहमती दर्शविली आहे. या संयुक्त घोषणापत्रानुसार उच्च-स्तरीय समन्वय आणि राजकीय दिशा देण्यासाठी आयजीसीच्या चौकटीत मंत्रिस्तरीय यंत्रणा स्थापन केली जाईल. India-Germany intergovernmental meeting


आंतर-सरकारी बैठकीनंतर एक संयुक्त निवेदन करण्यात आले, ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Joint Statement: 6th India-Germany Inter-Governmental Consultations
मंत्रीस्तरीय द्विपक्षीय बैठकीदरम्यान अनेक करार झाले. त्यांची यादी येथे पाहता येईल.
List of agreements signed on the occasion of 6th India-Germany Inter-Governmental Consultations
बर्लिगमध्ये व्यापार विषयक गोलमेज बैठकीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीचे चान्सलर महामहिम ओलाफ शोल्झ यांच्यासोबत व्यापार विषयक गोलमेज बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले. भारतात, सरकार करत असलेल्या व्यापक सुधारणांवर भर देत देशात मोठ्या संख्येने वाढत असलेल्या नवउद्यम (स्टार्ट अप्स) आणि युनिकॉर्नकडे त्यांनी लक्ष वेधले. उद्योग प्रमुखांनी भारतातील प्रतिभावान तरुणाईत गुंतवणूक करावी असे निमंत्रणच त्यांनी दिले. या कार्यक्रमात सरकारचे उच्चाधिकारी आणि दोन्ही बाजूंचे निवडक मुख्य कार्यकारी अधिकारी सहभागी झाले. त्यांनी हवामान विषयक सहकार्य, वितरण साखळ्या; संशोधन आणि विकास या विषयांवर चर्चा केली.


खालील उद्योग प्रमुखांनी व्यापार विषयक गोलमेज बैठकीत भाग घेतला:
भारतीय व्यापार शिष्टमंडळ:
संजीव बजाज (भारतीय शिष्टमंडळाचे प्रमुख) अध्यक्ष, सीआयआयचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, बजाज फिनसर्व्ह;
बाबा एन कल्याणी : अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, भारत फोर्ज;
सी के बिर्ला : व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी , सी के बिर्ला समूह;
पुनीत छटवाल : व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड;
सलील सिंघल : अध्यक्ष एमेरिटस, पीआय इंडस्ट्रीज;
सुमंत सिन्हा : अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, रिन्यू पॉवर आणि अध्यक्ष, असोचाम;
दिनेश खारा : अध्यक्ष, स्टेट बँक ऑफ इंडिया;
सी पी गुरनानी : व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, टेक महिंद्रा लिमिटेड;
दीपक बागला : मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक, इन्व्हेस्ट इंडिया;
जर्मन व्यापार शिष्टमंडळ:
रोलँड बाश : जर्मन शिष्टमंडळाचे प्रमुख, अध्यक्ष आणि सीईओ, सीमेन्स आणि अध्यक्ष, जर्मन व्यापार आशिया पॅसिफिक समिती;
मार्टिन ब्रुडरमुलर: कार्यकारी संचालक मंडळ अध्यक्ष, बीएएसएफ;
हर्बर्ट डायस: व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष, फोक्सवॅगन;
स्टीफन हार्टुंग : व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष, बॉश;
मारिका लुले: मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक, जीएफटी टेक्नॉलॉजीज;
क्लॉस रोसेनफेल्ड: मुख्य कार्यकारी अधिकारी, शेफलर;
ख्रिस्टियन स्वेवींग: मुख्य कार्यकारी अधिकारी डॉइश बँक;
राल्फ विंटरगर्स्ट, व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष,
गीसेके अॅन्ड डेव्हरीएन्ट जर्गेन झेश्की, मुख्य कार्यकारी अधिकारी, एनेरकॉन; India-Germany intergovernmental meeting


भारतीयांसोबत साधला संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बर्लिन येथील पॉट्सडेमर प्लॅट्झ या थिएटरमध्ये जर्मनीतील भारतीय समुदायाला संबोधित केले आणि संवाद साधला. विद्यार्थी, संशोधक आणि व्यावसायिकांचा समावेश असलेल्या जर्मनीतील यशस्वी भारतीय समुदायातील 1600 हून अधिक सदस्यांनी या कार्यक्रमात भाग घेतला. जर्मनीच्या अर्थव्यवस्थेत आणि समाजातील त्यांच्या योगदानाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. जागतिक स्तरावर भारतीय उत्पादनांचा प्रचार करून भारताच्या “वोकल फॉर लोकल” उपक्रमात योगदान देण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले. India-Germany intergovernmental meeting

