जलमार्ग मंत्री सोणोवाल, विठ्ठल भालेकर यांच्या पाठपुराव्याला यश
गुहागर, ता. 22 : भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाने (Inland Waterways Authority of India) दाभोळ खाडीतील जलमार्गाला राष्ट्रीय जलमार्ग (National Waterway) म्हणून मंजुरी दिली आहे. दाभोळ खाडीच्या मुखावर असलेला वाळुचा पट्टा हलविण्यासाठी 10 कोटींचा निधी मंजुर करण्यात आला आहे. असा निर्णय केंद्रीय बंदरे, जहाज व जलमार्ग (Ministry of Ports, Shipping and Waterways) मंत्री सर्बानंद सोणोवाल यांच्या मंत्रालयाने घेतला आहे. ही माहिती देणारे पत्र नुकतेच विठ्ठल भालेकर यांना मिळाले आहे. Inclusion of Dabhol Bay in National Waterways
गेली 6 वर्ष वेलदूर सहकारी मच्छी व्यावसायिक संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल भालेकर दाभोळ खाडीतील वाळुचा पट्टा (गोद – Sand Bar in Dabhol Bay)) हटविण्यासाठी पाठपुरावा करत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. केंद्रीय बंदरे, जहाज व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोणोवाल (Sarbanand Sonowal) यांचे पत्र विठ्ठल भालेकर यांना आले आहे.
Inclusion of Dabhol Bay in National Waterways
Ministry of Ports, Shipping and Waterways केंद्रीय मंत्री सोणोवाल यांनी पत्रात म्हटले आहे की, भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाने (Inland Waterways Authority of India – IWAI) राष्ट्रीय जलमार्ग अधिनियम 2016 द्वारा दाभोळ खाडीचा राष्ट्रीय जलमार्ग म्हणून समावेश केला आहे. या मार्गाला राष्ट्रीय जलमार्ग 28 (National Waterway 28) म्हणून ओळखले जाईल. भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणामार्फत राष्ट्रीय जलमार्ग 10, 28, 85 व 91 यांच्या विकासाची प्रक्रिया सुरु आहे. राष्ट्रीय जलमार्ग 10 आणि 28 यांच्या विकासासाठी 10 कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहेत. योजनेला अंतिम रुप मिळाल्यानंतर या निधीतून प्राधिकरणाच्या मानकांनुसार दाभोळ खाडीच्या (Dabhol Bay) मुखावर ड्रेजिंग (Dredging) करण्यात येईल. त्यामुळे 12 महिने दाभोळ खाडीतून समुद्रात छोट्या मोठ्या जहाजांची वहातूक सुरुळीत होईल. केंद्रात मोदी सरकार (Narendra Modi Government) आल्यानंतर भाजपचे (BJP) ज्येष्ठ कार्यकर्ते विठ्ठल भालेकर (Guhagar) या विषयासाठी केंद्र सरकारकडे (Central Government) पाठपुरावा करत होते. 7 एप्रिलला केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल (Prahlad Singh Patel) गुहागरच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी विठ्ठल भालेकर यांनी पटेल यांची भेट घेवून याबाबत सविस्तर चर्चा करुन निवेदन दिले होते. त्याचप्रमाणे केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला (Parshottam Rupala) सागर परिक्रमा दरम्यान 18 मे रोजी वेलदूरला (Guhagar) आले होते. त्यावेळीही विठ्ठल भालेकर यांनी याबाबतचे निवेदन दिले होते. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत केंद्रीय जलमार्ग मंत्री सर्बानंद सोणोवाल यांचे पत्र भालेकर यांना मिळाले आहे. Inclusion of Dabhol Bay in National Waterways