• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मंडणगडात समर्थ भंडारीच्या शाखेचे उद्‌घाटन

by Ganesh Dhanawade
November 6, 2022
in Ratnagiri
25 0
0
मंडणगडात समर्थ भंडारीच्या शाखेचे उद्‌घाटन
49
SHARES
140
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मंडणगड, ता. 06 : समर्थ भंडारी पतसंस्थेला सर्वोतोपरी सहकार्य राहील. असे प्रतिपादन मंडणगडच्या नगराध्यक्षा सौ. सोनल बेर्डे यांनी केले. तर आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या पतसंस्थेचा मंडणगड मधील सर्वच घटकांना फायदा होईल. असे उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे यांनी सांगितले. मंडणगड मधील समर्थ भंडारी पतसंस्थेच्या 16 व्या शाखेच्या उद्‌घाटन कार्यक्रमाला सौ. बेर्डे आणि श्री. कोकाटे उपस्थित होते. Inauguration of Samarth Bhandari

Inauguration of samarth bhandari Mandangad Br 1
Inauguration of samarth bhandari Mandangad Br.

श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या मंडणगड शाखेचा उद्‌घाटन सोहळा आज संपन्न झाला. मंडणगड नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष श्री. वैभव कोकाटे यांनी श्रीफळ वाढवले तर नगराध्यक्षा सौ. सोनल बेर्डे यांनी फीत कापून शाखा कार्यालयाचे उद्‌घाटन केले. पतसंस्थेचे अध्यक्ष प्रभाकर आरेकर यांच्यासह अन्य मान्यवरांनी दिपप्रज्वलन केले. पतसंस्थेसाठी जागा देणारे प्रबोध कोकाटे, श्रीधन इंटेरिअरचे मिथिलेश नरळकर यांचा सन्मान प्रभाकर आरेकर यांनी केला. Inauguration of Samarth Bhandari

संबधित बातम्या : बेस्ट चेअरमन पुरस्काराने प्रभाकर आरेकर सन्मानित

Inauguration of samarth bhandari Mandangad Br

पतसंस्थेच्या कामकाजाविषयी माहिती देताना प्रभाकर आरेकर म्हणाले की, या पतसंस्थेची वाटचाल पारदर्शकता, व्यावसायिकता, सुरक्षितता व विश्र्वासार्हता या चतु:सुत्रीवर आधारीत आहे. संस्थेचे ठेवी स्वीकारणे व कर्ज वितरण करणे याबाबतचे धोरण निश्चित आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आर्थिक मदत करुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी संस्था नेहमीच प्रयत्नशील राहीली आहे. संस्थेचा आर्थिक पाया भक्कम असून मंडणगडवासीयांना चांगल्या प्रकारे सेवा उपलब्ध करुन देण्यात येतील. संस्थेच्या ग्राहकांना एटीएम, आरटीजीएस, एनईएफटी, चेक कलेक्शन यासारख्या सुविधा संस्थेने उपलब्ध करुन दिल्या आहेत. Inauguration of Samarth Bhandari

संबधित बातम्या : पारदर्शकात आणि विश्र्वासार्हता जपणारी पतसंस्था

Inauguration of samarth bhandari Mandangad Br

यावेळी नगराध्यक्षा सौ. सोनल बेर्डे, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे यांनी संस्थेच्या मंडणगड शाखेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. नगरपंचायतीकडून सर्वोतपरी मदत करण्याचे आश्र्वासन दिले. श्रीपाद (भैय्या) कोकाटे, परकर गुरुजी, देवकर गुरुजी व श्री. जाधव यांनी देखील मनोगत व्यक्त करत संस्थेला शुभेच्छा दिल्या. Inauguration of Samarth Bhandari

यावेळी पतसंस्थेचे  उपाध्यक्ष हेमचंद्र हळदणकर, संचालक दिलीप मयेकर, सुहास भोसले, अरुण पाटील, विजय जाधव, पराग आरेकर, संचालिका सौ. स्मिता आरेकर, श्रीम. पल्लवी भाटकर यांच्यासह रागिणी आरेकर, आर्यन आरेकर , संस्थेचे कर्मचारी आणि मंडणगडमधील हितचिंतक उपस्थित होते. उद्‌घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप रहाटे केले. Inauguration of Samarth Bhandari

Tags : Guhagar News, Marathi News, मराठी बातम्या, News in Guhagar, ताज्या बातम्या, लोकल न्युज, Guhagar, टॉप न्युज, Latest News, Latest Marathi News, Samarth Bhandari Nagari Patsanstha, Inauguration of Samarth Bhandari,

Tags: GuhagarGuhagar NewsInauguration of Samarth BhandariLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSamarth Bhandari Nagari Patsansthaटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share20SendTweet12
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.