• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 February 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण

by Guhagar News
October 9, 2023
in Ratnagiri
89 1
0
Inauguration of Ratneshwar Library Ambulance
175
SHARES
501
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती

रत्नागिरी, ता. 09 : तालुक्यातील धामणसे येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या नूतनीकृत व ऑक्सिजन सेवेसह सुसज्ज रुग्णवाहिकेचे उद्या (ता. १० ऑक्टोबर) दुपारी ३.३० वाजता लोकार्पण करण्यात येणार आहे. ग्रंथालयाच्या सभागृहात जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून यावेळी सरपंच अमर रहाटे आणि श्री रत्नेश्वर ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुळकर्णी उपस्थित राहणार आहेत. Inauguration of Ratneshwar Library Ambulance

Inauguration of Ratneshwar Library Ambulance

रत्नागिरीतील प्रसिद्ध दानशूर व आंबा बागायतदार प्रभाकर गोविंद तथा तात्यासाहेब अभ्यंकर यांनी (कै.) नलिनी गो. अभ्यंकर व (कै.) गोविंद प. अभ्यंकर यांच्या स्मरणार्थ श्री रत्नेश्वर ग्रंथालयास पंचक्रोशीतील ग्रामस्थांचीसोय होण्यासाठी देणगी म्हणून रुग्णवाहिका दिली. १४ जुलै २०१४ रोजी दिलेली ही धामणसें पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या सेवेसाठी रुजू करण्यात आली होती. ही रुग्णवाहिका नुतनीकरणासाठी बडोदा येथील देणगीदार रवींद्र कुलकर्णी व निवेंडीतील येथील रवींद्र तुपे यांच्या सहकार्याने नुतनीकरण करून ऑक्सिजन सेवेसह सुसज्ज सुविधेसह परत एकदा रुग्णवाहिकेसाठी लोकार्पण सोहळा होणार आहे. तात्या अभ्यंकर यांची उद्या जयंती आहे. त्याचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सात चालकांनी कोव्हीड काळात जीव धोक्यात घालून रुग्णांना रुग्णालयात पोहोचवले. याबद्दल त्यांचा सत्कार पोलिस अधीक्षकांच्या हस्ते करण्यात येणार आहे. Inauguration of Ratneshwar Library Ambulance

ग्रंथालयाने रुग्णवाहिका चालवणे ही गोष्टच कौतुकास्पद आणि गावाची अत्यंत आवश्यक गरज होती. गेल्या ९ वर्षांत या रुग्णवाहिकेने अनेक गंभीर रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. या कार्यक्रमासाठी धामणसे पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सचिव मुकुंद जोशी, उपाध्यक्ष विलास पांचाळ, संचालक प्रशांत रहाटे, अनंत जाधव, विश्वास धनावडे, सौ. कुलकर्णी, ग्रंथपाल केशव कुळकर्णी यांनी केले आहे. Inauguration of Ratneshwar Library Ambulance

Tags: GuhagarGuhagar NewsInauguration of Ratneshwar Library AmbulanceLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share70SendTweet44
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.