संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 11 : तालुक्यातील आबलोली येथे गोर – गरीब जनतेला मुंडेकर विमा सेवांचा लाभ मिळावा. तसेच एलआयसीच्या सर्व सेवा एकाच छता खाली उपलब्ध व्हाव्यात. यासाठी भातगाव गावातील धीरज भागा मुंडेकर यांनी मुंडेकर विमा सेवा कार्यालय सुरु केले आहे. Inauguration of Mundekar Insurance Service Office at Aabloli

धीरज मुंडेकर यांनी आपल्या भातगाव गावी या व्यवसायाची मुहूर्तमेढ अनेक वर्षां पासून रोवली होती. उत्तम व्यवसाय आणि विश्वास याच्या जोरावर गुहागर तालुक्यातील अनेक गावात ते एलआयसीची सेवा देत आहे. या व्यवसायात काम करत असताना धीरज भागा मुंडेकर याला एलआयसीचा जागतिक स्तरावरील पुरस्कार एमडीआरटी हा किताब सलग तीन वर्ष पटकावला आहे. याचे सर्व श्रेय तो आपल्या विमाधारकांना देत आहे. ग्रामीण भागात आठशे ते हजार लोकांना विम्याची सेवा देत आहे. गुहागर तालुक्यातील आबलोली येथे बाजारपेठ येथे नुकतेच त्याच्या मुंडेकर विमा सेवा कार्यालयाचे उदघाटन धूमधडाक्यात त्याच्या आई- वडिलांच्या हस्ते करण्यात आले. Inauguration of Mundekar Insurance Service Office at Aabloli
या उदघाटन सोहळ्याला आबलोली गावच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके,आबलोली व्यापारी संघटना अध्यक्ष सचिनशेठ बाईत यांचेसह विमाधारक महिला – पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते. Inauguration of Mundekar Insurance Service Office at Aabloli
