गुहागर, ता.12 : निर्मल ग्रामपंचायत कोतळूक कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन नूकतेच करण्यात आले. यावेळी माजी सरपंच, जमीन मालक दत्तात्रय उर्फ अण्णा ओक यांच्या हस्ते फित सोडून तर सरपंच सौ. उर्मिला गोरिवले यांनी श्रीफळ वाढवून करण्यात आले. Inauguration of Kotluk Gram Panchayat

कोतळूक ग्रामपंचायत इमारत नादुरुस्त झाली होती. तीचे नूतनीकरण करून सुसज्ज इमारत होण्याची मागणी सतत होत होती. ग्रामनिधी, आर.आर. आबा पाटील सुंदर स्वच्छ गाव योजना बक्षिसाची रक्कम, १५ वित्त आयोग अशा निधीतून या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या नूतन इमारतीचे नामफलकाचे अनावरण गंगाराम पाष्टे यांच्या हस्ते करण्यात आले. या नूतन कार्यालय इमारतीच्या कामाचा शुभारंभ फेब्रुवारी २०२१ मध्ये करण्यात आला होता. यावेळी उपस्थित मान्यवरांचे केळीचे रोप देऊन स्वागत करण्यात आले होते. Inauguration of Kotluk Gram Panchayat

या उद्घाटन कार्यक्रमावेळी माजी सभापती गणपत शिगवण, विलास वाघे, पंचायत समिती माजी सदस्य लक्ष्मण शिगवण, गटविकास अधिकारी अमोल भोसले, बांधकाम शाखा अभियंता श्री. ढगे, प्रमुख मानकरी नंदकुमार नार्वेकर, देवस्थान समितीचे अध्यक्ष सुनिल भेकरे, शशिकांत उर्फ भाई बागकर, जानू भेकरे, उपसरपंच संजीवनी जावळे, सदस्य सचिन ओक, शितल गोरिवले, संचिता गुरव, सेजल शिगवण, कोतळूक सोसायटी चेअरमन पांडुरंग कावणकर, व्हा. चेअरमन अनंत चव्हाण, माजी उपसरपंच शिवराम मोहिते, तंटामुक्त समिती अध्यक्ष विजय बाधावटे, पोलिस पाटील अनुजा वाघे, संचिता मोहिते, ग्रामविकास अधिकारी मोहन घरत, डाटा ऑपरेटर समीर ओक, मक्तेदार कुणाल तांडेल आदींसह बहुसंख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होते. Inauguration of Kotluk Gram Panchayat

