पंढरपूर मार्गे जाणाऱ्या गाड्या सुरु ठेवण्याची वारकऱ्यांची विनंती
गुहागर, ता. 13 : आषाढी एकादशीप्रमाणेच कार्तिकी एकादशीला पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची गुहागर तालुक्यात मोठी संख्या आहे. हे वारकरी दरवर्षी गुहागरमधुन स्वतंत्र एसटीने किंवा एसटीच्या पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर या गाड्यांनी पंढरपूरात पोचतात. काही महिन्यांपुर्वी भारमान नसल्याचे कारण दाखवत गुहागर आगारातून पंढरपुर मार्गे जाणाऱ्या बहुतांशी गाड्या बंद झाल्या आहेत. दिवाळीच्या सुट्टीसाठी या मार्गावर सोडण्यात येणाऱ्या गाड्या 16 नोव्हेंबरला बंद होणार आहेत. त्यामुळे कार्तिक वारीसाठी पंढरपुरला जाण्याऱ्या वारकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. Inadequate ST trains for Kartik Vari


कोकणात आषाढ वारीचे वेळी अनेक शेतकरी शेतीच्या कामात गुंतलेले असतात. दिवाळी दरम्यान या शेतकऱ्यांची भात कापणी संपते. नाचणी वेचून पूर्ण होते. छोटी शेते असतील तर भात झोडणी, नाचणीची मळणीची कामे ही पूर्ण होतात. प्रत्यक्ष शेतातील कामे पूर्ण झाल्याने तालुक्यातील अनेक वारकरी कार्तिक वारीला पंढरपूरला जातात. आषाढवारीप्रमाणे पदयात्रा न करता सर्वजण एसटीला पसंती देतात. Inadequate ST trains for Kartik Vari
गुहागरमधुन पंढरपूरला जाण्यासाठी पंढरपूर आगाराची एस.टी. होती. तसेच गुहागर आगाराची अक्कलकोट, तुळजापूर या एस.टी. होत्या. 10-15 वारकऱ्यांना या एस.टी.ने जाणे सोयीचे होते. मात्र गेल्या काही महिन्यात गुहागर आगारातील कमी भारमानाच्या लांब पल्ल्याच्या एस.टी. फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. केवळ गर्दीच्या हंगामात तात्पुरत्या कालावधीत या एस.टी. सुरु असतात. यावेळी देखील दिवाळी सुट्टीचा हंगामात 16 नोव्हेंबरपर्यंत या एस.टी. बसेस सुरु रहाणार आहेत. त्यानंतर या बसेस बंद होणार आहेत. त्यामुळे वारकऱ्यांची मोठी पंचाईत झाली आहे. Inadequate ST trains for Kartik Vari


कार्तिक वारी होईपर्यंत गुहागर बसस्थानकातून पंढरपुर, अक्कलकोट, तुळजापूर या फेऱ्या सुरु रहाव्यात. अशी वारकऱ्यांची मागणी आहे. त्यासाठी त्यांनी गुहागरचे प्रभारी आगार व्यवस्थापक पवार यांची भेट घेतली. मात्र सदरच्या फेऱ्या सुरु करणे अशक्य आहे. आपण स्वतंत्रपणे एस.टी. बुक करावी. तरच तुमची व्यवस्था होऊ शकते. असे प्र. आगार व्यवस्थापक पवार यांनी सांगितले. त्यावर 10 ते 15 वारकऱ्यांच्या गटाला 52 सीट शोधणे शक्य नाही. तुम्ही कार्तिकवारीसाठी एस.टी. सुरु केलीत तर अनेक वारकरी एस.टी.ने येतील. आम्ही देखील तालुक्यातील वारकऱ्यांना आवाहन करु. अशी विनंती पालपेणे येथील वारकरी दत्ता नरवणकर यांनी आगार व्यवस्थापक यांच्याकडे केली. परंतु आगार व्यवस्थापक पवार यांनी माझ्या अधिकाराच्या मर्यादा असल्याचे सांगत एस.टी. सोडायला नकार दिला आहे. एस.टी.च्या या भुमिकेवर कार्तिकी एकादशीला पंढरपुरला वारीला जाण्याऱ्या अनेक वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. Inadequate ST trains for Kartik Vari