• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरमध्ये लसीकरणाला सुरवात

by Mayuresh Patnakar
January 18, 2021
in Old News
16 0
0
गुहागरमध्ये लसीकरणाला सुरवात
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कोविन ॲपने निश्चित केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश

गुहागर, ता. 16 : तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात आज लसीकरणाला (Vaccination) सुरवात झाली. पहिल्या टप्प्यात ग्रामीण रुग्णालय गुहागर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोलीमधील 100 आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोविड लस देण्यास सुरवात झाली आहे.
गुहागर तालुक्यात मार्च 2020 मध्ये जिल्ह्यातील पहिला कोरोनाचा रुग्ण सापडला. तेव्हापासून कोरोनावर औषध कधी येणार याची  उत्सुकता सर्वांनाच होती. 15 ऑगस्टला मा. पंतप्रधानांनी लशीसंदर्भात पहिली घोषणा केली. तेव्हापासून संपूर्ण देशात लस केव्हा येणार याची उत्सुकता होती. डिसेंबर महिना अखेर काही जिल्ह्यात ड्राय रन झाली. तेव्हा ही रत्नागिरी जिल्ह्यात कुठे ही कार्यक्रम झाला नाही. त्यामुळे देशात लसीकरणाला सुरवात होणार त्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यात, गुहागर तालुक्यात लसीकरण कधी असा प्रश्र्न होता. पण शासनाने आश्र्चर्याचा धक्काच दिला. संपूर्ण देशात लसीकरणाला सुरवात झाली त्याच दिवशी गुहागरमध्येही लसीकरणचा शुभारंभ झाला.
कोल्हापूरहून जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी मार्गे ही लस (covishield vaccine) शुक्रवारी ग्रामीण रुग्णालय गुहागर येथे पोचली. त्याचप्रमाणे कोविन ॲपवर निवडलेल्या गुहागर तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांची नावे ही शुक्रवारी आरोग्य यंत्रणेला कळली. त्यानंतर निवडलेल्या सर्वांना शनिवारी ग्रामीण रुग्णालयात लस टोचून घेण्यासाठी बोलावण्यात आले. शुक्रवारी लसीकरणाची टीम तयार करुन रंगीत तालीम घेण्यात आली.
शनिवारी (ता. 16) लसीकरण केंद्र रांगोळ्यांनी सजविण्यात आले होते. निवड झालेल्या कर्मचाऱ्यांचे आधार कार्ड क्रमांक cowin portal ऑनलाईन नोंदणी मध्ये नोंदविल्यानंतर सदर कर्मचाऱ्याच्या मोबाईवर ओटीपी येतो. हा ओटीपी संगणकाला दिल्यानंतर व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण होते. त्यानंतर सदर कर्मचाऱ्याला लस टोचण्यात आली. लसीकरण केंद्राशेजारीच विश्रांती कक्ष उभारण्यात आला आहे. तेथे कर्मचाऱ्याला अर्धातास थांबविण्यात आले. अशाप्रकारे दिवसभरात 100 कर्मचाऱ्यांना लस टोचण्यात येणार आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत 52 कर्मचाऱ्यांना लस टोचून झाली. अशी माहिती वैद्यकिय अधिकारी डॉ. बळवंत यांनी दिली.
लसीकरणाचे काम वैद्यकिय अधिक्षक जयंत दाभोळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीम. मालप, सौ. वरणे, सौ. कानडे, रसिका पवार, अंजना कांबळे, विभुते या परिचारिका, अनुश्री पोलाजी लसीकरण सल्लागार व अलंकार कोळथरकर सुरक्षा रक्षक या टीमने केले.

राज्यातही पहिल्या दिवशी १८ हजार कर्मचाऱ्यांना लसीकरण पूर्ण
15 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीयस्तरावरील शुभारंभानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सकाळी साडे अकराच्या सुमारास मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ झाला. राज्यातील २८५ केंद्रांवर उत्साहात आरोग्य कर्मचाऱ्यांनी  लस  घेतली. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना येथे तर राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते शिरोळ येथे शुभारंभ  करण्यात आला. बहुतांश जिल्ह्यांमध्ये संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा शुभारंभ झाला. लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी  सुमारे १८ हजार ३३८ हून अधिक  (सुमारे ६४ टक्के) कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. लसीमुळे कुठेही गंभीर दुष्परिणाम झाल्याची नोंद नसल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

Tags: Breaking NewsCorona NewsCovid19Cowin AppGuhagarGuhagar NewsLatest NewsLocal NewsMarathi NewsNews in GuhagarProcedure of VaccinationRural HospitalTop newsVaccinationVaccination in Indiaकोविडकोविड लसीकरणकोविन ॲपगुहागरगुहागर न्युजग्रामिण रुग्णालयटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share12SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.