सततच्या अपघातांमुळे मनसेची मागणी
गुहागर, ता. 17 : गुहागर – विजापुर राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील चिवेली फाटा येथे सतत अपघात होत आहेत. या ठिकाणी त्वरित गतिरोधक बसविण्यात यावे, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागरच्या वतीने उपविभागीय अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग चिपळूण यांना देण्यात आले. दरम्यान, निवेदन देऊन १५ दिवसांचा कालावधी होवून सुद्धा राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने आंदोलन छेडण्याचा इशारा गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांनी दिला आहे. Immediate deadlock at Chiveli Fata
गुहागर – विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील चिवेली फाटा या अपघात क्षेत्र असलेल्या ठिकाणी गतिरोधक बसवणे गरजेचे आहे. या अपघात स्थळी यापूर्वीही अनेक अपघात झालेले आहेत व आता होत आहेत. या ठिकाणी दोन्ही बाजूंनी वाहने भरधाव वेगाने येत जात असतात. तसेच बाजारपेठ असल्याने अनेक ग्राहक व नागरिक या ठिकाणी येत जात असतात. त्याचप्रमाणे अनेक वाहने या ठिकाणहून भरधाव वेगाने जात येत असतात. तसेच वाहने व नागरीक रस्ता क्रॉसिंग करत असताना अनेक वेळा अपघाताच्या घटना घडत असतात. याठिकाणी गतिरोधक बसविल्यास वाहन चालकांच्या वेगावर नियंत्रण येईल व या ठिकाणी अपघातही कमी प्रमाणात होतील. यापूर्वीही राष्ट्रीय महामार्गावरील अपघात होणाऱ्या ठिकाणी गतिरोधक बसविण्यात आले आहेत. तसेच या धर्तीवर या अपघात ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचे नियम बाजूला सारून राष्ट्रीय महामार्गाने हे ठिकाण अपघात क्षेत्र म्हणून घोषीत करुन या ठिकाणी गतीरोधक बसवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. Immediate deadlock at Chiveli Fata
येत्या काही दिवसात राष्ट्रीय महामार्गाने गतिरोधक न बसविल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन छडेल असा इशारा देऊन या ठिकाणी अपघात झाल्यास सर्वस्वी जबाबदारी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांची राहील, असेही तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांनी सांगितले. Immediate deadlock at Chiveli Fata