पूरातत्व विभागाची कारवाई, आता लक्ष विकासाकडे
गुहागर ता, 24 : तालुक्यातील राज्य संरक्षित स्मारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोपाळगड किल्ल्यावरील अवैध बांधकाम अखेर आज जमीनदोस्त झाले. 2 एप्रिल 2025 नंतर बांधकाम पडणार हे निश्चित होते. मात्र प्रत्यक्षात कारवाई होत नव्हती. अखेर शनिवारी (ता. 24 ) पुरातत्व विभाग रत्नागिरीचे सहाय्यक संचालक डॉक्टर विलास वाहने यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली किल्ल्यावरील अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. Illegal Construction on Gopalgad demolished


Illegal Construction on Gopalgad demolished
गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील गोपाळगड किल्ल्यामध्ये (Fort Gopalgad) तेथील जागा मालकाने सन 2014 मध्ये अनधिकृत बांधकाम केले होते. सदर अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याची अंतिम सूचना सहाय्यक संचालक, पुरातत्व विभागीय कार्यालय रत्नागिरी यांनी १७ मार्च २०२५ रोजी सुफिया युनूस मणियार व कादिर हुसेन मण्यार यांना देण्यात आली होती. सदर नोटीसीवर म्हणणे मांडण्यासाठी २ एप्रिल २०२५ पर्यंतची मुदत दिली होती. परंतू कोणतेच म्हणणे सादर झालेले नाही. त्यामुळे किल्ल्यातील अनधिकृत बांधकाम (Illegal Construction) पाडण्याचा मार्ग मोकळा झाला होता. Illegal Construction on Gopalgad demolished
अखेर शनिवारी ( ता. 24) पुरातत्व विभाग (Archaeology Department) रत्नागिरीचे सहाय्यक संचालक डॉक्टर विलास वाहने यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली गोपाळगड किल्ल्यातील दुकान, घर, पाणी साठवण्याची टाकी, 2 स्वच्छतागृहे, आणि आंबे ठेवण्यासाठी उभारण्यात आलेला चिरेबंदी मांडव जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून 1पोलीस अधिकारी व 3 पोलीस तैनात करण्यात आले होते. तहसीलदार परिक्षित पाटील यांच्यासह मंडल अधिकारी, तलाठी हे देखील उपस्थित होते. Illegal Construction on Gopalgad demolished
दिर्घकालीन लढा
गोपाळगडाला खासगी मालकीतून मुक्त करण्याचा दिर्घकाळ चाललेला लढा आता खऱ्या अर्थाने यशस्वी झाला आहे. अनेक दुर्गप्रेमींचा या लढ्यात सहभाग होता. खासगी मालकी असलेल्या या किल्ल्याचे कागदोपत्री अस्तित्वच नव्हते. केवळ आंबाची बाग अशी नोंद असलेल्या शासनाच्या कागदपत्रात गोपाळगडाची नोंद करावी लागली. भुमिअभिलेखाद्वारे या गडाची मोजणी करावी लागली. पुरातत्त्व विभागाला इतिहासातील नोंदी द्याव्या लागल्या. जनजागृतीसाठी उपक्रम करावे लागले. शासनाकडे आग्रही मागणीसाठी जनतेचा पाठींबा घ्यावा लागला. सातत्यपूर्ण लढ्यातून राज्य शाससाने गोपाळगड किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारक जाहीर केले. तरीही किल्ल्यावर असलेले अवैध बांधकाम खासगी जागा मालकाचे अस्तित्व दाखवून देत होते. आज 24 मे रोजी खऱ्या अर्थाने हे अस्तित्वही संपले आणि दिर्घकालीन लढ्याची यशस्वी सांगता झाली. Illegal Construction on Gopalgad demolished.


आता लक्ष विकासाकडे
एक मोठी लढाई शिवप्रेमी, दुर्गप्रेमींनी जिंकली आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून हा दिर्घकाळ लढा देणाऱ्या मावळ्याने नव्या मोहिमेची आखणी करावी लागणार आहे. किल्ला शासनाच्या ताब्यात जाणे ही अर्धी लढाई होती. आता या किल्ल्याची डागडुजी करणे, किल्ल्याची माहिती देणारे फलक उभे करणे, किल्ल्यावर छत्रपतींच्या आरमाराची यशोगथा सांगणारे दालन उभे करणे, किल्ल्यावर कोणतेही अनुचित प्रकार घडणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी फलक लावणे अशी विविध कामे करावी लागतील. यासाठी शासनाकडे सततचा पाठपुरावा करावा लागेल. ही सर्व कामे पूर्ण होवून गोपाळगड पुन्हा वैभव प्राप्त करेल तेव्हा खऱ्या अर्थाने म्हणता येईल की याच साठी केला होता गोपाळगड मुक्तीचा अट्टाहास. Illegal Construction on Gopalgad demolished