नवी दिल्ली, ता. 08 : आयसीसी महिला वर्ल्डकप २०२५ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. या स्पर्धेला येत्या ३० सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आहे. ICC Women’s World Cup in India

या स्पर्धेत एकूण ८ संघ जेतेपदासाठी झुंज देताना दिसून येणार आहेत. बऱ्याच वर्षांनी भारताला महिलांच्या वर्ल्डकप स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. त्यामुळे यावेळी आयोजन जोरदार होणार, यात काहीच शंका नाही. दरम्यान स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. या स्पर्धेची सुरूवात भारत आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या सामन्याने होणार आहे. ICC Women’s World Cup in India