मुख्याध्यापक शिवाजी आडेकर यांचे प्रतिपादन
गुहागर, ता.18 : विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून भावी शिक्षणासाठी मार्गक्रमण करत राहिल्यास भविष्यात कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही, असे प्रतिपादन श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक शिवाजी आडेकर यांनी केले.श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरमध्ये उत्तीर्ण झालेल्या बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. HSC pass students honored

यावेळी वाणिज्य प्रथम ऋतुजा भोसले, पूजा घुमे, प्रणित डेरे, प्राजक्ता साटले, शास्त्रमध्ये सानिका वेल्लाळ, इशा पवार, करण साळवी तर कला मध्ये समृद्धी रामाने, साक्षी भेकरे, माधुरी गोडे आदी गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गुहागर एज्युकेशन सोसायटीचे सी ई ओ दीपक कनगुटकर, मुख्याध्यापक शिवाजी आडेकर, उपमुख्याध्यापक सुधाकर कांबळे, पालक संघ उपाध्यक्ष दीपक देवकर, सहसचिव गौरी घाडे, सोनाली हळदणकर, विलास कोरके, विद्यार्थ्यांचे पालक व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. HSC pass students honored

