• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
11 April 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मुलींना HPV लसीकरणापासून वंचित ठेवू नये

by Guhagar News
March 19, 2026
in Guhagar
59 0
0
HPV Vaccination for Girls
116
SHARES
330
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घनश्याम जांगीड यांचे आवाहन

गुहागर, ता. 19 : आपल्या लाडक्या मुलींना HPV लसीकरणापासून वंचित ठेवू नये. नजीकच्या ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन लसीकरण करून घ्यावे. अफवावर विश्वास न ठेवता तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तसेच वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून शंका निरसन करून घ्या, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घनश्याम जांगीड यांनी केले आहे. HPV Vaccination for Girls

HPV लसीकरणामुळे मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळते. हा अत्यंत महत्त्वाचा सार्वजनिक आरोग्य उपक्रम आहे. सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका व आशा आपल्या कार्यक्षेत्रात जनजागृती करून पात्र मुलींची याद्या तयार करून 14 वर्ष पूर्ण झालेल्या परंतु 15 वर्ष पूर्ण न झालेल्या मुलींच्या लसीकरणासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमुळे पालकांच्या मनात शंका निर्माण होत असल्याने तालुक्यातील लसीकरण मोहीम राबविण्यात अडचणी येत आहे. खाजगी दवाखान्यात या लसीकरणासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. म्हणून शासनाने उपलब्ध करून दिलेल्या लसीकरणाचा लाभ, तालुक्यातील पालकांनी आपल्या लाडक्या मुलींसाठी घ्या. असे आवाहन डॉ. जांगीड यांनी केले आहे. HPV Vaccination for Girls

Tags: GuhagarGuhagar NewsHPV Vaccination for GirlsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share46SendTweet29
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.