आमदार जाधव, तळवली येथे आरोग्य वर्धिनी केंद्राचे उद्घाटन
गुहागर, दि. 21: तालुक्यातील जिल्हा परिषद राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्र तळवली. या नूतन इमारतीचे तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी निवासस्थान इमारतीचे उद्घाटन आ. जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. Hospital is a public service temple

यावेळी आमदार जाधव म्हणाले की, आरोग्य विभागात आज ४२ टक्के पदे रिक्त आहेत. दोन्ही तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दर्जेदार व सर्व सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे. जनतेने विकासकामे करणाऱ्याच्या सदैव पाठीशी असले पाहिजे. जिल्ह्यातील दर्जेदार व सोयी सुविधांनी युक्त असलेली इमारत जनतेच्या सेवेत देताना मनाला आनंद होत आहे. सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या हॉस्पिटलच्या इमारतीकडे लोकसेवेचे मंदीर आहे, या भावनेने पहावे असे प्रतिपादन आमदार भास्कर जाधव यांनी केले. Hospital is a public service temple

जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी सांगितले की, विकासकामे करण्याची संधी गुहागर तालुक्याने दिली. त्यामुळे गुहागर तालुक्यामध्ये भरीव काम करण्याचा निर्णय करून मी कामाला लागलो. अध्यक्ष पदाच्या वर्ष भराच्या कारकिर्दीत कोट्यावधीची विकास कामे झाली. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ५७ ॲम्बुलन्स मिळवून देण्यास यशस्वी झालो आहे. त्यापैकी ७ ॲम्बुलन्स गुहागर तालुक्याला मिळाल्या आहे. आरोग्य उपकेंद्रांसाठी सामुदायिक आरोग्य अधिकारी याच्या जास्तीत जास्त नेमणुका गुहागर तालुक्यात झाल्या आहेत. त्याप्रमाणे तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जास्तीत जास्त निधी देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोलर पॅनल उभारण्यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे. Hospital is a public service temple
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आटल्ये, विनायक मुळे, गुहागर पंचायत समिती सभापती पूर्वी निमुनकर, उपसभापती सिताराम ठोंबरे, माजी सभापती विभावरी मुळे, तहसीलदार प्रतिभा वराळे, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण ओक, पंचायत समिती सदस्य पांडुरंग कापले, सुनिल पवार, गटविकास अधिकारी अमोल भोसले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. घनश्याम जांगिड, तळवली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज देशमुख, डॉ. मयुरी देसाई, राष्ट्रीय आरोग्य अभियानचे कार्यकारी अभियंता अमर सोनवणे, डॉ. राजेंद्र पवार, डॉ. देविदास चरके, इम्रान घारे, सरपंच मयुरी शिगवण, उपसरपंच अनंत डावल, कंत्राटदार अभिजीत जाधव आदी उपस्थित होते. Hospital is a public service temple
