नवनिर्वाचित सरपंचांनी दिले सहकार्याचे आश्र्वासन
गुहागर : तालुक्यातील जि. प. पूर्ण प्राथ. आदर्श शाळा वेलदूर नवानगर मधील शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नवनिर्वाचित सरपंच सौ. दिव्या वणकर यांचा सत्कार करण्यात आला. Honoring Divya Wankar
शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने ऋतुजा रोहीलकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना सरपंच सौ. दिव्या वणकर म्हणाल्या की, या सत्काराबद्दल मी आभारी आहे. वेलदूर नवानगर शाळेने या स्पर्धेच्या युगात शाळेची पटसंख्या दिवसेंदिवस वाढत जाऊन टिकवून ठेवली आहे. शाळेची पाच वेळा राज्यस्तरावर निवड झालेली आहे. तसेच शाळेला जिल्हा परिषदेचा आदर्श शाळा पुरस्कार मिळालेला आहे. स्वच्छ विद्यालय अंतर्गत जिल्हास्तरावर शाळेची निवड झालेली आहे. या शाळेचा आम्हाला अभिमान वाटतो. शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अशी ग्वाही त्यांनी दिली. Honoring Divya Wankar
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सानिया वणकर, सुरक्षा रोहीलकर, सुहानी नाटेकर, ऋतुजा रोहीलकर, स्मिता जांभरकर, विद्या रोहिलकर, मनश्री पालशेतकर, अस्मिता नाटेकर, चेतना जांभारकर, मुख्याध्यापक मनोज पाटील, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र जांभारकर, दिलीप पालशेतकर, सत्वशीला जगदाळे, अंजली मुद्दमवार, पल्लवी घुले, निलोफर शेख, फिरती प्रयोगशाळा शिक्षक श्री. खांडेकर आदी उपस्थित होते.Honoring Divya Wankar
