चारुता आठवले ठरली “उत्कृष्ट बालवाचक” तर रुक्मिणी कुलकर्णी “जेष्ठ वाचक”
गुहागर, दि.15 : स्त्रियांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, पुस्तकाच्या सहवासात राहून त्यांना बाहेरील जगाचे ज्ञान व्हावे, विविध क्षेत्रातील गोष्टींची माहिती त्यांना मिळावी, विविधांगी विचारांची देवाण-घेवाण व्हावी. या उदात्त हेतूने गुहागरच्या ज्ञानरश्मी वाचनालयाच्या (Gyanarashmi Libraries) वतीने विविध उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येते. वाचनालयाच्या जेष्ठ सदस्या सुप्रिया बारटक्के यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुण्या सई ओक यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक महिला दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. Honored by Guhagar Gyanarashmi Library


मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजन करण्यात आले. प्रा. सौ. मनाली बावधनकर यांनी जागतिक महिला दिन साजरा करण्यामागील भूमिके विषयी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. गुहागर मध्ये बाल संस्कार वर्ग चालवत असलेल्या प्रमुख पाहुण्या सई ओक यांनी आजच्या काळात मोबाईल पासून मुलांना दूर ठेवण्यासाठी संस्कार वर्गाची कशी गरज आहे, हे पटवून दिले. तसेच महिलांना आपल्या आरोग्याची काळजी घेणे कसे गरजेचे आहे. याविषयी मार्गदर्शन केले. Honored by Guhagar Gyanarashmi Library
यावेळी उपस्थित महिलांपैकी अपर्णा आठवले, पारिजात कांबळे, सौ. आगाशे, नेहा दीक्षित, अमृता शिंदे, कु. आर्या गोयथळे. कु. ऋजुता दीक्षित यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर कु. मानसी घुमे हिने सुरेल आवाजात गाणं सादर केले. त्यावेळी ज्ञानरश्मी वाचनालयातर्फे. कु. चारुता मंदार आठवले हिचा उत्कृष्ट बालवाचक म्हणून सत्कार करण्यात आला. तर ९० वर्षाच्या श्रीमती रुक्मिणी कुलकर्णी यांचा जेष्ठवाचक म्हणून सन्मान करण्यात आला. Honored by Guhagar Gyanarashmi Library
उपस्थित सर्व महिलांसाठी प्रश्नमंजुषा व हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. गौरी घाडे यांनी सूत्रसंचालन प्रा. मनाली बावधनकर यांनी तर आभार अन्वी गुडेकर यांनी मानले. यावेळी सानिका जांगळी, शामली घाडे व बहुसंख्य महिला भगिनी उपस्थित होत्या. Honored by Guhagar Gyanarashmi Library

