• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वरवेली ग्रामपंचायतीतर्फे जेष्ठ नागरिकांचा सन्मान

by Ganesh Dhanawade
August 19, 2023
in Guhagar
186 2
0
Honor of senior citizens

Honor of senior citizens in Varveli

366
SHARES
1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 19 : तालुक्यातील वरवेली ग्रामपंचायतीच्या वतीने 75 वर्षांवरील ज्येष्ठ 31 ग्रामस्थांचा सन्मान करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता समारोहानिमित्त आम्ही हा सत्कार करत असल्याचे सरपंच नारायण आग्रे यांनी यावेळी सांगितले. Honor of senior citizens

तालुक्यातील वरवेली ग्रामपंचायतीच्या वतीने माझी माती, माझा देश अभियानातंर्गत दि. ९ ते १४ ऑगस्ट दरम्यान विविध उपक्रम राबविण्यात आले. माजी उपसरपंच भिकाजी महादेव शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर पंचप्रण शपथ झाली. शहीद जवानांच्या नावे उभारलेल्या शिलालेखाचे अनावरण सरपंच नारायण आगरे यांनी केले. संपूर्ण गावात अमृत वाटिका वृक्षारोपण करण्यात आले. Honor of senior citizens

Honor of senior citizens

याच सोहळ्याचा भाग म्हणून वरवेली ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये गावातील ७५ वर्षे पूर्ण असणाऱ्या जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये लक्ष्मण रांजाणे, पांडुरंग गावडे, किसन आगरे, सोनू राजाणे, गोपाळ रांजाणे, कृष्णा रांजाणे, मधुकर पवार, नंदकुमार विचारे, शंकर धुमक, पार्वती राजाणे, बाळाराम शिंदे, सुनंदा रांजाणे, इंदिरा गावडे, गंगा रांजाणे, इंदिरा राजाणे, धर्माजी आगरे, नामदेव रावणंग, गंगाधर नारकर ,महादेव रांजाणे, भिकाजी शिंदे, विजय रसाळ, सावित्री रांजाणे, इंदिरा गोरीवले, सावित्री सखाराम रांजाणे, राधिका कृष्णा भुवड, सावित्री पांडुरंग रांजाणें, सुनंदा राजाणे, सरस्वती’ करंदेकर ,रुक्मीणी रावणग, सुभद्रा रावणंग,रुक्मीणी गावडे आदी जेष्ठ नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी सरपंच नारायण आगरे, उपसरपंच मृणाल विचारे, सर्व ग्रा.प. सदस्य, माजी सरपंच सुप्रिया देसाई, पुनम रावणंग, जगन्नाथ शिंदे, वैभव पवार, पत्रकार गणेश किर्वे, संतोष देसाई, तंटामुक्त समिती अध्यक्ष अरुण आगरे, मधुकर बारगोडे, जितेंद्र विचारे, पोलीसपाटील सुजित शिंदे, आशिष विचारे, निलेश रसाळ, शाळेतील सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका मदतनीस, आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक महेश भुवड आदी उपस्थित होते. Honor of senior citizens

Tags: GuhagarGuhagar NewsHonor of senior citizensLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share146SendTweet92
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.