स्वप्नील घटे
दाभोळ, ता.14 : आजकाल लहान थोर मंडळींना वेडं लावणारं माध्यम म्हणजे मोबाईल. तोही फुकटचा मिळाला तर तात्काळ बंद करुन सिमकार्डची विल्हेवाट लावणारे अनेक जण पहायला मिळतात. पण प्रत्येक गोष्टीला अपवादही पहायला मिळतो. दोनच दिवसापुर्वी पाच लाखाचे दागिणे परत करणारे मूरकर गुरुजी पाहीले. तर काल चक्क एका शालेय विद्यार्थ्याला सापडलेला मोबाईल जसाच्या तसा मालकाला परत दिला. यावरुन दापोलीत प्रामाणिकपणा ओतपोत भरुन राहीला आहे, असेच म्हणावे लागेल. Honesty
आर. जी. पवार माध्यमिक शाळा माटवण येथील कुडावळे वळजाई गावातील विद्यार्थी सार्थक रणजीत कदम याने सापडलेला मोबाईल परत करून प्रामाणिकपणा दाखविला आहे. सार्थक रणजीत कदम मंडणगड दापोली गाडीतून दापोली स्टॅंडवर आला असता त्याला बसच्या सीट खाली मोबाईल सापडला. उतरल्यानंतर त्याने बसस्थानकात सदर फोनबद्दल चौकशी करत आहे का पाहीले. थोड्या वेळाने पेपर स्टाॅल जवळ बसून किमान एखादा काॅल येतो का याची वाट पाहू लागला. एवढ्यात त्याला पोलीस कर्मचारी दिसले. Honesty
विनाविलंब तो त्यांचेकडे गेला आणि सदर फोन आपणास सापडला आहे असे सांगून तो त्यांच्याकडे दिला. त्याचवेळी ज्यांचा मोबाईल होता त्या शिंदे नामक महिला आल्या. त्यांनी सदरील मोबाईल आपला असल्याचे सांगितले. सार्थक कदम याने दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल बक्षीस देऊन श्रिमती शिंदेसह उपस्थितांनी कौतूक केले. या घटनेवरुन दापोलीत पुन्हा एकदा प्रामाणिकपणाचे दर्शन घडून आले. Honesty
