Guhagar News: जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा (Sports) अंजनवेल येथील बाल भारती पब्लिक स्कूल येथे पार पडल्या. या स्पर्धेत बालभारती पब्लिक स्कूल अंजनवेल, श्रीदेव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यालय गुहागर, श्री. पांडुरंग रुपाजी फटकरे माध्यमिक विद्यालय शीर, न्यु इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे व सदानंद सुदाम पाटील विज्ञान श्री. महेश जनार्दन भोसले वाणिज्य व कै. विष्णू पवार कला कनिष्ठ महाविद्यालय गुहागर या संघांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी आरजीपीपीएलचे CEO असीमकुमार सामंता, DGM HR डॉ. जॉन फिलीप, गुहागर तालुका समन्वयक एस.एस. मोरे, क्रीडा शिक्षक निलेश गोयथळे आदी उपस्थित होते. Hollyball Tournament in Balbharti आरजीपीपीएलचे सीईओ असीमकुमार सामंता यांनी विविध खेळाडूंची आपल्या भाषणातून उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
Hollyball Tournament in Balbharti
या स्पर्धेत बाल भारती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले. १४ वर्षाखालील मुले, मुली गटामध्ये बाल भारती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा प्रथम प्रमांक व विद्यार्थींनीही प्रथम क्रमांक पटकावला. १७ वर्षाखालील मुले, मुली गटामध्ये बाल भारती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक व विद्यार्थींनीही प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय श्री. देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यालय गुहागर व तृतीय श्री. पांडुरंग रुपाजी फटकरे माध्यमिक विद्यालय शीर यांनी तर १९ वर्षाखालील मुले, मुली गटामध्ये बाल भारती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक व विद्यार्थींनीही प्रथम क्रमांक पटकावला. या दोन्हीही गटातील संघांची शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड झाली. या संघांना क्रीडा शिक्षक नाविनदर लखनपाल यांचे मार्गदर्शन लाभले.Hollyball Tournament in Balbharti
बाल भारती पब्लिक स्कूलचे प्राचार्य सुरजित चटर्जी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी याच्या वतीने प्राचार्यांनी दोन्हीही संघांचे अभिनंदन व कौतुक केले.Hollyball Tournament in Balbharti