गुहागर : तालुक्यातील शृंगारतळी येथील व्यापारी संघाच्या वतीने आगीमध्ये गादी कारखाना पूर्ण भस्मसात झाला होता. आगीमुळे आर्थिक नुकसान झालेले गादी कारखाना मालक वीरेंद्रभाई चौगुले यांना शृंगारतळीतील व्यापारी संघाच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली. Helping nature
भाई चौगुले यांच्यावरील कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी मदतीचा हात म्हणून रुपये दीड लाख त्यांना सुपूर्द करण्यात आले. Helping nature
यावेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष मोहनभाई संसारे, उपाध्यक्ष प्रफुल्ल विखारे, उपाध्यक्ष विशाल बेलवलकर, सेक्रेटरी सुनील गमरे, खजिनदार संदीप कोंडविलकर, सहखजिनदार श्याम शिर्के, सदस्य असीमभाई साल्हे, सुरेंद्र मर्दा, दाऊदभाई साल्हे आदी मान्यवर उपस्थित होते. Helping nature
Helping nature
याबाबत बोलताना मोहनभाई संसारे म्हणाले की, आमच्या एका तरुण व्यापाऱ्यांवर मोठे संकट ओढवले. त्याचे नुकसान इतके मोठे आहे. अशावेळी आम्ही तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत हा विश्वास त्याला देण्याचे काम श्रुगांरतळीतील व्यापारी वर्गाने केले आहे. श्रुगांरतळीतील व्यापारी, छोटे दुकानदार या सर्वांनी उत्स्फूर्तपणे ही मदत केली. आपल्यातील एक व्यावसायिक संकटातून बाहेर पडावा ही भावना, इच्छा महत्त्वाची आहे.
