• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

महावितरणने स्थापन केले सहा तक्रार निवारण कक्ष

by Manoj Bavdhankar
September 3, 2020
in Old News
20 0
0
mahavitran distributio
40
SHARES
113
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

ग्राहकांच्या संतप्त प्रतिक्रियांनंतर नियोजन, भाजप मनसेने केली होती मागणी

गुहागर, ता. 03 : महावितरणने तालुक्यातील गुहागर, शृंगारतळी, आबलोली, पालशेत, तळवली व रानवी या शाखा कार्यालयांमध्ये विशेष तक्रार निवारण कक्ष उघडले आहेत. अशी माहिती गुहागरचे उप अभियंता गणेश गलांडे यांनी दिली आहे. भरमसाठ बीलांमुळे सर्वसामान्य ग्राहकांनी महावितरणच्या उपविभागीय कार्यालयावर  धडक दिली होती.
महावितरण कंपनीने भरमसाठ वीज बिले माथी मारल्याने तालुक्यातील सुमारे साडेतीनशे संतप्‍त ग्राहकांनी सोमवारी (31 ऑगस्ट) शहरातील महावितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. वाढीव बीलांमुळे संतप्‍त असलेल्या ग्राहकांनी येथील अधिकार्‍यांना धारेवर धरल्याने अखेर जमावाला शांत करण्यासाठी अधिकार्‍यांना पोलिसांना बोलवावे लागले होते. या घटनेनंतर भाजप तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता, चिपळूण व उप अभियंता गुहागर यांच्याकडे निवेदन दिले. तालुका कार्यालयातील वाढत्या गर्दीमुळे तसेच कोरोना पार्श्‍वभूमीवर वीज बिलांमधील त्रुटी सुधारण्याकरता महावितरणने गुहागर तालुक्यातील आपल्या सहा शाखा कार्यालयात व्यवस्था करावी. अशी त्यांनी मागणी केली होती.  मनसेचे तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी उपअभियंता गणेश गलांडे यांची भेट घेवून वाढीव बीले रद्द करावी अशी मागणी केली होती. तसेच बीले रद्द न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.
या पार्श्र्वभुमीवर महावितरणने तातडीने एक संदेश ग्राहकांपर्यंत पोचविला. या संदेशात म्हटले आहे की, गुहागर तालुक्यातील गुहागर, शृंगारतळी, आबलोली, पालशेत, तळवली व रानवी या शाखा कार्यालयांमध्ये विशेष तक्रार निवारण कक्ष उघडण्यात आले आहेत. चालू महिन्यामध्ये वीज बिले वाटण्यात आली आहेत.  यामध्ये ग्राहकांच्या काही शंका असल्यास किंवा बिलामध्ये त्रुटी आढळून आल्यास त्यांनी सदर शाखा कार्यालयांना भेट द्यावी. तेथील कक्षात शंकानिरसन केले जाईल. जेणेकरुन जेणेकरून वीज ग्राहकांना प्रवास व गर्दी टाळता येईल व कोणताही गोंधळ उडणार नाही. सदर केंद्रांना भेट देताना मास्क परिधान करणे व सोशल डिस्टनसिंगचे पालन करणे अनिवार्य आहे.

Tags: Electricity billsGuhagarGuhagar NewsLatest NewsMahavitaranMarathi NewsNews in Guhagarताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share16SendTweet10
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.