कबड्डी स्पर्धेत मुलींचा संघ गुहागर तालुक्यात प्रथम
गुहागर, ता. 17 : रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2025 -26 मध्ये देवघर येथे घेण्यात आलेल्या पावसाळी कबड्डी क्रीडा स्पर्धेत गुहागर तालुक्यातील हेदवी येथील मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटी संचलित, मातोश्री लक्ष्मीबाई भाऊ हेदवकर विद्यानिकेतन या विद्यालयाच्या 17 वर्षाखालील मुलींच्या संघाने तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळविला. Hedvi School’s success in Kabaddi sports competition

या पावसाळी कबड्डी क्रीडा स्पर्धेत सहभागी खेळाडू विद्यार्थिनी, मार्गदर्शक शिक्षक श्री.चव्हाण सर व श्री.मोरे सर व सौ.रेडीज मॅडम यांचे सर्वांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. Hedvi School’s success in Kabaddi sports competition