आईसह दोन मुले जखमी, गुहागरात मुसळधार
गुहागर, ता. 23 : तालुक्यात शनिवारी रात्री पासूनच पावसाचा जोर वाढला होता. Heavy Rain in Guhagar रविवारी दिवसभर पावसाने झोडपून काढले. साखरी बुद्रुक परिसराला पावसासह वादळी वार्याचा फटका बसला. या गावातील एक महिला व दोन मुले घरावरील पत्रे पडून जखमी झाली. तालुक्यातील 14 घरांचे सुमारे 6 लाख 57 हजार 410 रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.
Heavy Rain in Guhagar
शनिवारी (ता.22) रात्रीपासूनच गुहागर तालुक्यात सर्वत्र वेगवान वार्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे तालुक्यात तिन ठिकाणी विजेचे खांब पडले. अनेक वृक्ष उन्मळून पडले. साखरी बुद्रुक परिसरात वादळ झाले. या वादळामुळे विकास पंढरीनाथ मोहिते यांच्या घरावरील पत्र्याचे छप्पर कोसळले. त्यावेळी सौ। प्राची मोहिते व त्यांची दोन लहान मुले घरात होती. पत्रे व अन्य साहित्य अंगावर पडून आईसह दोन्ही मुले जखमी झाली. तातडीने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. तिघांची प्रकृती उत्तम असल्याने संध्याकाळी त्यांना घरी पाठवण्यात आल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. जांगीड यांनी सांगितले आहे.Heavy Rain in Guhagar
या वादळात साखरी बुद्रुक मधील हरिचंद्र नागे यांच्या गोठ्याचे 8090 रुपयांचे नुकसान झाले. दिपाली काताळकर यांच्या घराचे 5370 रु., नंदा देवजी मोहिते यांच्या घराचे 1लाख 3 हजार 800 रु., शारदा शरद मोहिते यांच्या घराचे 1लाख 700 रु., प्रकाश तुकाराम मोहिते यांच्या घराचे 98 हजार 300 रु., कांचनी विजय मोहिते यांच्या घराचे 8 हजार रु., राजेश पंढरीनाथ मोहिते यांच्या घराचे 76 हजार रु., मारुती धोंडू मोहिते यांच्या घराचे 10 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.Heavy Rain in Guhagar
Heavy Rain in Guhagar
तालुक्यातील निगुंडळ बौद्ध वाडी मध्ये विद्युत वाहिनी तारांवर झाडाची फांदी पडून दोन पोल तुटले यामध्ये बौद्धवाडीतील आनंद पवार यांच्या घराचे नुकसान झाले आहे. आंबेरे खुर्द पंचशील नगर येथेही दोन विजेचे खांब पडले. कोंडकारुळ येथील विकेश रविंद्र ढोर्लेकर यांचा घरालगतचा संरक्षक चिरेबंदी बांध पडून अंदाजे एक लाख रुपयांपर्यंत नुकसान झालेले आहे. वेळणेश्वर येथील वासंती अप्पा जमसुडकर यांच्या घराची भिंत मुसळधार पावसामुळे कोसळली. पंचनाम्यात 2 लाख, 26 हजार 500 रुपयांचे नुकसान नमूद करण्यात आले आहे. पेवे येथे अरुण विठ्ठल मोहिते यांच्या घराची पडवी पडून सुमारे 16550/- रु चे नुकसान झालेले आहे. मौजे कोंडकारुळ येथील श्रीमती.नलिनी नरेश अडुरकर यांच्या घरावरती लगतचा बांध पडुन घराचे पुर्णत: नुकसान झाले. सदरचे घर इंदिरा आवास योजनेंतर्गत बांधलेले होते. सदरच्या घटनेचा पंचनामा सा. बां. विभागाद्वारे करण्यात येणार आहे. बंदरवाडी येथील वंदना गजानन पावरी यांच्या घरालगत असलेले झाड उन्मळून पडले. यामध्ये घराचे अंशतः नुकसान झाले आहे.Heavy Rain in Guhagar