फ्रेंड सर्कल मंडळ व नेहरू युवा मंडळ रत्नागिरी आयोजित; डॉ. शशांक ढेरे
गुहागर, दि. 05 : खालचापाट, फ्रेंड सर्कल मंडळ व नेहरू युवा मंडळ रत्नागिरी. यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. शशांक ढेरे उपस्थित होते. कोरोना काळात डायबिटीज तसे अन्य व्यक्तींना त्रास झाला. काही मृत्यू ही झाले. असे प्रतिकारशक्ती कमी करणारे आजार होऊ नये. यासाठी सर्वांनीच व्यायाम, प्राणायाम दैनंदिन जीवनाचा भाग केला पाहिजे. असे आवाहन डॉक्टर शशांक ढेरे यांनी केले आहे. Health Guidance in Guhagar


डॉ. ढेरे म्हणाले की, यापूर्वी विद्यार्थी रिकामा वेळ मिळाला की मैदानात खेळताना दिसत होते. आताचे विद्यार्थी युवक रिकाम्या वेळात मोबाईल, टीव्ही, इंटरनेटवर वेळ घालवतात. याच बरोबर सर्वांनीच फास्ट फूड खाणे टाळणे. आहारामध्ये कच्च्या पालेभाज्या सकस जेवण महत्त्वाचे आहे. जाहिराती पाहून झटपट बॉडी बनवण्याच्या नादात प्रोटीन पावडर किंवा अन्य बाबींकडे युवक जाताना दिसतात. तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय असे काही करू नये अशाने शरीराची हानी होऊ शकते. व्यक्तीच्या वजनाएवढे प्रोटीन दररोज शरीरात गेले पाहिजेत. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा अपायकारक ठरू शकतो. व्यसनाधीनता वाढत आहे निरोगी आयुष्यासाठी तरुणांनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. Health Guidance in Guhagar
यावेळी मनोज पाटील, मंडळाचे अध्यक्ष सागर मोरे, माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे, एडवोकेट मयुरेश पावसकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज विखारे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर हॉटेल असोसिएशनचे शामकांत खातू , चिपळूण अर्बन बँकेचे संचालक अजय खातू, हेमचंद्र आरेकर मंडळाचे उपाध्यक्ष अनिकेत भोसले सचिव रोहन विखारे आदी उपस्थित होते. Health Guidance in Guhagar

