तहसीलदार वराळे यांनी केले कौतुक; चिपळूणातील अपरान्त, नँबचे सहकार्य
गुहागर, दि 25 : तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतीतर्फे १५ व्या वित्त निधी अंतर्गत आरोग्य विषयक महाशिबीर घेण्यात आले होते. हा उपक्रम येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाला. सदर महाशिबिरासाठी चिपळूणचे अपरांत हॉस्पिटल व नॅब हॉस्पिटल यांचे विशेष सहकार्य लाभले. Health camp in Patpanhale

या आरोग्य विषयक महाशिबिरात इ. सी. जी., मधुमेह, रक्तदाब, नेत्र, किशोरवयीन मुलींची हिमोग्लोबिन तपासणी, करण्यात आली. वयोवृद्धांना व रुग्णांना आधारकाठी देण्यात आली. या आरोग्य शिबीराचा शुभारंभ तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. Health camp in Patpanhale
तहसीलदार वराळे यांनी गुहागर तालुक्यात प्रथमच ग्रा.पं. तर्फे महाशिबीर आयोजित करून रुग्णांना सेवा देण्याचा उपक्रम राबविल्याबद्दल ग्रामपंचायतीचे कौतुक केले. अपरांत हॉस्पिटलचे डॉ. कुलकर्णी गुहागरमधील मध्यवर्ती ठिकाणच्या शृंगारतळीत येऊन रुग्णांना सेवा देतात, हे कौतुकास्पद आहे. नागरिकांनी आरोग्य विषयक आजारांबाबत दुर्लक्ष न करता योग्य वेळीच वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे, असा सल्ला प्रतिभा वराळे यांनी दिला. Health camp in Patpanhale गुहागर तालुका वैद्यकीय अधिकारी घनश्याम जांगीड यांनी ग्रा. पं. ने आयोजित केलेल्या आरोग्य विषयक उपक्रमाबाबत कौतुक केले. उपस्थितांना विविध आजार व उपचार, आरोग्यविषयक राबवले जाणरे उपक्रम याबाबत मार्गदर्शन केले. याबाबत अनेकांना तपासणीची सेवा देण्यात आली. Health camp in Patpanhale
यावेळी तहसीलदार प्रतिभा वराळे, गटविकास अधिकारी डॉ. अमोल भोसले, प्रभारी पो. नि. बी. के. जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी घनश्याम जांगीड, अपरांत हॉस्पिटलचे वैद्यकिय अधिकारी डॉ. कुलकर्णी, सरपंच संजय पवार, उपसरपंच उमेश कदम, सर्व सदस्य व ग्रामविकास अधिकारी आर. जी. बेंडल आदी उपस्थित होते. Health camp in Patpanhale

