चिपळूणातील अपरान्त, नँबचे डाँ. करणार तपासणी
गुहागर, ता.16 : तालुक्यात पाटपन्हाळे हे मध्यवर्ती ठिकाणी आहे. पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने छ. शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून. १५ व्या वित्त आयोग निधी अंतर्गत दि. १९ फेब्रुवारी रोजी आरोग्य विषयक महाशिबिराचे आयोजन केले आहे. अशा माहिती सरपंच संजय पवार यांनी दिली. Health camp in Patpanhale


पाटपन्हाळे ग्रा.पं. नेहमीच शासनाच्या विविध स्तरावरच्या योजना राबविणे, स्वच्छता, आरोग्य, शैक्षणिकदृष्ट्या लक्ष ठेवून उपाय योजना करीत असते. कोरोना काळातही कोरोना संबंधातील उपाययोजना, जनजागृती करुन कोरोनाला हद्दपार करीत शासनाच्या पारितोषिकास पात्र ठरलेली ग्रामपंचायत आहे. घनकचरा यासाठीही या ग्रामपंचायतचे योग्य नियोजन आहे. सरपंच संजय पवार, उपसरपंच उमेश कदम, सर्व सदस्य तसेच ग्रामविकास अधिकारी आर. जी. बेंडल व ग्रा.पं.चे सर्व कर्मचारी यांनी योग्य नियोजन करून मेहनत घेतली होती. Health camp in Patpanhale
आरोग्य विषयक महाशिबिरामध्ये ४० वर्षावरील व्यक्तींची मधुमेह तपासणी करुन औषधोपचार पुरविणे, वृद्ध नागरिकांची आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी करणे, किशोरवयीन मुलींची हिमोग्लोबिन तपासणी करुन आवश्यक औषधोपचार पुरविणे तसेच वृद्धांकरिता चष्मे व आधारकाठी पुरविणे अशा प्रकारच्या तपासण्या होणार आहेत. यासाठी अपरान्त हाँस्पीटलचे डॉ. अक्षय चौगुले, डॉ. गौतम कुलकर्णी, डॉ. भक्ती पालांडे व डॉ. प्राजक्ता जाधव असे तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. Health camp in Patpanhale
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती गुहागरच्या तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे, गटविकास अधिकारी अमोल भोसले, पोलीस निरीक्षक श्री. जाधव व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घनश्याम जहांगीर उपस्थित राहणार आहेत. या महाशिबिराचा लाभ फक्त ग्रा.पं. पाटपन्हाळे हद्दीतील मतदार ग्रामस्थांनाच देण्यात येणार आहे. पाटपन्हाळे गावातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच संजय पवार यांनी केले आहे. Health camp in Patpanhale